Shaheen Afridi : सेलीब्रेशन करताना आफ्रिदीने घेतली मोठी रिस्क; फायनलला मुकणार...

संघाचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी सेलिब्रेशनमध्ये एवढा मग्न होता की तो पुन्हा....
Shaheen Afridi
Shaheen Afridisakal

Shaheen Afridi T20 World Cup : : T20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा 7 गडी राखून पराभव केला. या सामन्यात बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानने शानदार खेळ दाखवला. पाकिस्तानने जवळपास 13 वर्षांनंतर टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. मात्र, हा विजय मिळवणे पाकिस्तानसाठी सोपे नव्हते.

पाकिस्तान पहिले दोन सामने गमावून संघ स्पर्धेतून बाहेर होण्याच्या मार्गावर होता, पण नशिबाने अशा प्रकारे संघाला साथ दिली की, संघाने उपांत्य फेरीतही मजल मारली आणि विजय मिळवून अंतिम फेरीचे तिकीट निश्चित केले. न्यूझीलंडला हरवल्यानंतर पाकिस्तानी खेळाडू जल्लोष करताना दिसले. मात्र, यावेळी संघाचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी सेलिब्रेशनमध्ये एवढा मग्न होता की, तो पुन्हा दुखापती होता होता राहिला.

Shaheen Afridi
Kane Williamson : 'हा पराभव पचवणे कठीण', कर्णधार विल्यमसनच्या डोळ्यात...

आयसीसीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये शाहीन आफ्रिदी खूप आनंदी दिसत आहे. खेळाडूंसोबत सेलिब्रेशन करत असताना त्याने बाबर आणि रिझवान मिठी मारत दोघांनाही एकाच वेळी दोन्ही हातांनी हवेत उचलून घेतले. हे पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले, कारण रिझवान आणि बाबरचे वजन सुमारे 130 ते 150 किलो असेल, अशा स्थितीत वेगवान गोलंदाजाला दुखापतीची भीती वाटू लागली.

Shaheen Afridi
New Zealand : 'काळी चिमणी मिळायला पाहिजे लेका!' न्यूझीलंडचं 7 वर्षात 5 वेळा असं झालंय

पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 गडी गमावून 152 धावा केल्या. डॅरिल मिशेलने 35 चेंडूत नाबाद 53 तर कर्णधार केन विल्यमसनने 42 चेंडूत 46 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने 19.1 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्याचा पाठलाग केला. कर्णधार बाबर आझमने 42 चेंडूत 53 धावा आणि मोहम्मद रिझवानने 43 चेंडूत 57 धावा केल्या. रिझवानला त्याच्या खेळीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com