VIDEO: शाहीन आफ्रिदीने फलंदाजाला थेट पाठवले हॉस्पीटलमध्ये; भारताला दिला इशारा

शाहीन आफ्रिदीने दुखापतीनंतर केले शानदार पुनरागमन
T20 World Cup 2022 Shaheen Afridi
T20 World Cup 2022 Shaheen Afridisakal
Updated on

T20 World Cup 2022 Shaheen Afridi : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने दुखापतीनंतर शानदार पुनरागमन केले आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात आफ्रिदीने तुफानी गोलंदाजी केली. या डावखुऱ्या गोलंदाजाने 4 षटकात केवळ 29 धावा देत 2 बळी घेतल्या आहेत. अशा प्रकारे त्याने टीम इंडियाला इशारा दिला आहे.

T20 World Cup 2022 Shaheen Afridi
Kapil Dev : T20 वर्ल्डकप दरम्यान टीम इंडियासंदर्भात कपिल देव यांचे धक्कादायक विधान, म्हणाले...

T20 विश्वचषक मध्ये भारत आणि पाकिस्तान 23 ऑक्टोबर रोजी आमनेसामने येणार आहेत. आफ्रिदीने बुधवारी अफगाणिस्तानविरुद्ध नवीन चेंडूने अप्रतिम गोलंदाजी केली. सराव सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम खेळताना 6 गड्यांच्या मोबदल्यात 153 धावा केल्या आहेत. हा सामना पाकिस्तानसाठी महत्त्वाचा आहे. पहिल्या सराव सामन्यात त्याला इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला होता.

T20 World Cup 2022 Shaheen Afridi
जय शाहच्या वक्तव्यानंतर PCB ची BCCI ला धमकी - वाचा काय आहे प्रकरण

वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी 3 महिन्यांनंतर दुखापतीतून पुनरागमन करत आहे. पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याने रहमतुल्ला गुरबाजला एलबीडब्ल्यू केले. यावेळी यष्टिरक्षक फलंदाज रहमानउल्ला गुरबाजच्या पायाला दुखापत झाली. खेळाडूंनी त्याला खांद्यावर घेऊन बाहेर काढले. त्यांना खातेही उघडता आले नाही. आफ्रिदीने आपल्या तिसऱ्या षटकात हजरतुल्ला जझाईला बोल्ड करून विरोधी संघाला महत्त्वपूर्ण धक्का दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com