Shahid Afridi : शाहीद आफ्रिदी नवा निवडसमिती अध्यक्ष; पाकिस्तान क्रिकेटमध्ये बदलाचे वारे

Shahid Afridi
Shahid Afridiesakal

Shahid Afridi Pakistan chief selector : पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीची पाकिस्तानचा नवा अंतरिम निवडसमिती अध्यक्ष बनवण्यात आले आहे. तो मायदेशात होणाऱ्या न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेत पाकिस्तानचा संघ निवडणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नवे चेअरमन नजाम सेठी यांनी पदभार स्विकारल्या स्विकारल्या जुन्या सर्व समिती बर्खास्त करून टाकाल्या होत्या त्यानंतरची ही पहिली नियुक्ती आहे.

Shahid Afridi
Ind vs Ban 2nd Test Day 3 Live: केएल राहुलकडून पुन्हा निराशा; भारताला पहिला धक्का

मागच्या वर्षी न्यूझीलंडच्या संघाने पाकिस्तानचा दौरा सुरक्षिततेच्या कारणास्तव रद्द केला होता. आता २६ डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या दौऱ्यासाठी न्यूझीलंडचा संघ पुन्हा पाकिस्तानमध्ये पोहचला आहे. नुकताच इंग्लंडच्या संघाने पाकिस्तानला त्यांच्याच भूमीत कसोटी मालिकेमध्ये व्हाइट व्हॉश दिला आहे. या पार्श्वभूमीवर न्यूझीलंडचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या दौऱ्यात दोन कसोटी, तर तीन एकदिवसीय सामने खेळविले जाणार आहेत.

Shahid Afridi
Virat Kohli : अजिंक्य रहाणेच हवा होता! विराट कोहलीचे हे व्हर्जन पाहून...

त्यापूर्वीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डात मोठा बदल झाला. पाकिस्तानचे चेअरमन रमीझ राजा यांची गच्छंती झाली. पाकिस्तानचा पहिल्यांदाच मायदेशात कसोटी मालिकेत व्हाईट वॉश झाला. इंग्लंडने त्यांचा तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 3 - 0 असा पराभव केला. यानंतर रमीझ राजांची गच्छंती होणार हे निश्चत होते. अखेर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी त्यांची उचलबांगडी करत नजाम सेठी यांच्याकडे पदभार सोपवला. यापूर्वी देखील सेठी यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख पद भुषवले आहे.

नजाम सेठी यांनी पदभार स्विकारल्या स्विकारल्या जुन्या सर्व समित्या रद्द करून टाकल्या. त्यानंतर आता शाहिद आफ्रिदीचे अंतरिम निवडसमिती अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. या समितीत शोएब अख्तर आणि इंझमाम उल हक यांची देखील नावे चर्चेत होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com