विराटनंतर रोहितला कर्णधार केल्याबद्दल आफ्रिदी म्हणाला... | Afridi on Kohli Rohit | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विराटनंतर रोहितला कर्णधार केल्याबद्दल आफ्रिदी म्हणाला...

मुंबईच्या हिटमॅनकडे देण्यात आलं टीम इंडियाचं नेतृत्व

विराटनंतर रोहितला कर्णधार केल्याबद्दल आफ्रिदी म्हणाला...

sakal_logo
By
विराज भागवत

Rohit Sharma T20 Captain: विराट कोहलीने भारताच्या टी२० संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर मुंबईचा हिटमॅन रोहित शर्मा याला हे पद सोपवण्यात आले. न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यातील टी२० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर झाला. त्यात रोहितला संघाचा कर्णधार जाहीर करण्यात आले. विराटनंतर रोहितकडे संघाचे नेतृत्व दिले जाईल असं सांगितलं जात होतं. त्यावर BCCI च्या निवड समितीने शिक्कामोर्तब केले. या निर्णयानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याने आपलं मत व्यक्त केलं.

हेही वाचा: विराट नाही.. रोहित नाही, टीम इंडियाला नवा कॅप्टन?

"विराटनंतर रोहित शर्माला कर्णधारपद दिलं जाणं यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. असा निर्णय घेतला जाणार याची दीर्घकाळापासून चर्चा होती. रोहित शर्मासोबत मी डेक्कन चार्जर्स संघातून खेळलो आहे. तो एक अप्रतिम खेळाडू आहे याची मला कल्पना आहे. फलंदाजी करताना त्याची फटकेबाजी पाहण्यासारखी असते. तो मैदानावर अतिशय शांत असतो. पण गरज पडल्यास त्याचा आक्रमक अंदाजही पाहायला मिळतो. रोहितला कर्णधारपद मिळणारच होतं, यात वाद नाही. पण त्यासोबतच आणखी महत्त्वाचं म्हणजे, त्याला कर्णधारपद मिळायला हवंच होतं हेही तितकंच खरं आहे", असं मत आफ्रिदीने व्यक्त केलं.

हेही वाचा: Video: भरमैदानात आफ्रिदीची 'ती' कृती.. भारतीय फॅन्सचा संताप!

भारताचा न्यूझीलंड विरूद्धच्या टी२० मालिकेसाठी संघ-

रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), ऋतूराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज

loading image
go to top