
शाहीन आफ्रिदीची ती अॅक्शन तुम्हाला पटत्ये का पाहा
Video: भरमैदानात आफ्रिदीची 'ती' कृती.. भारतीय फॅन्सचा संताप!
IND vs PAK, T20 World Cup 2021: पाकिस्तान विरूद्धच्या टी२० वर्ल्ड कप सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना २० षटकांमध्ये ७ बाद १५१ धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार विराट कोहलीच्या, रोहित शर्मा आणि लोकेश राहुल हे तिघेही एकाच गोलंदाजाचे शिकार ठरले. पाकचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याने त्यांना माघारी धाडले. याच शाहीनवर सध्या भारताचे चाहते त्याच्या एका कृतीमुळे प्रचंड संतापल्याचे दिसत आहे.
भारताच्या दमदार फलंदाजी युनिटला रोखण्यात सर्वात मोठा वाटा होता तो पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीचा... त्याने दमदार कामगिरी करत पाकला सामन्यात वरचढ होण्याची संधी दिली. त्याने आधी रोहित शर्माला पहिल्या चेंडूवर माघारी धाडले. त्यानंतर त्याने लोकेश राहुललाही स्वस्तात बाद केले. या दोघांना तंबूत धाडल्यानंतर १९व्या षटकात त्याने अर्धशतकवीर विराट कोहलीलाही बाद केलं. ४ षटकांच्या आपल्या स्पेलमध्ये ३१ धावा देत त्याने ३ महत्त्वाचे घेतले. हे बळी कसे घेतले त्याची कृती करून दाखव अशी मागणी चाहत्यांनी त्याला भरमैदानात केली. त्यावेळी त्याने त्यांची कृती करून दाखवली.
पाहा व्हिडीओ-
पण, शाहीन शाह आफ्रिदीची ही कृती भारतीय चाहत्यांना रूचली नाही. त्यांनी शाहीनवर चांगलीच टीका केली.
दरम्यान, भारताचा पाकिस्तानने पराभव केल्यानंतर न्यूझीलंडकडूनही भारत पराजित झाला. त्यामुळे भारताचे स्पर्धेचे आव्हान डळमळीत झाले. म्हणूनच पुढील तीनही सामने मोठ्या फरकाने जिंकूनही भारताला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला.