Shahid Afridi : माझ्या नेतृत्वात पाकिस्तान वर्ल्डकप खेळण्यासाठी भारतात गेला तेव्हा... आफ्रिदीचं मोठं वक्तव्य

Shahid Afridi recalled went to India for the World Cup
Shahid Afridi recalled went to India for the World Cup esakal

Shahid Afridi Recalled Went to India For The World Cup : पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात तीन कसोटी सामन्याची मालिका 1 डिसेंबरपासून सुरू होत आहे. रावळपिंडी येथे पहिला कसोटी सामना आजपासून सुरू झाला. दरम्यान, इंग्लंड संघाला कसोटी सामन्यापूर्वी संसर्गजन्य विषाणूचा फटका बसला. संघातील अनेक खेळाडूंना याची लागण झाली. मात्र याचा सामन्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. इंग्लंड तब्बल 17 वर्षांनंतर पाकिस्तानात कसोटी मालिका खेळत आहे.

दरम्यान, कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने आपली सामन्याची संपूर्ण फी ही पाकिस्तानातील पूरग्रस्तांसाठी देणार असल्याची घोषणा केली. बेन स्टोक्सच्या या कृतीचे पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने देखील तोंडभरून कौतुक केले.

Shahid Afridi recalled went to India for the World Cup
CAC : अशोक मल्होत्रा, जतीन परांजपेंची BCCI क्रिकेट सल्लागार समितीवर निवड

आफ्रिदी म्हणाला की, 'मी अशा कृतीचे नेहमीच समर्थन करत असतो. ज्यावेळी आम्ही वर्ल्डकप खेळण्यासाठी भारतात गेलो होते त्यावेळी मी संघाचा कर्णधार होतो. त्यावेळी मी म्हणालो होतो की भारतात जेवढा आदर आम्हाला मिळाला तेवढा पाकिस्तानात देखील मिळत नाही. हा एक सकारात्मक संदेश होता. त्यावेळी परिस्थीती देखील पोषक होती. त्यावेळी आम्ही भारतात जावे की नाही याबाबत शंका होती. एक खेळाडू म्हणून संपूर्ण जग तुमच्याकडे बघत असतं. त्यावेळी तुम्ही तुमच्या देशाचे रेप्युटेशन चांगले ठेवण्याचा अटोकाट प्रयत्न करता.'

बेन स्टोक्सबद्दल आफ्रिदी म्हणाला की, 'बेन स्टोक्सची कृती ही जबरदस्त आहे. हा एक चांगला संदेश आहे. अशा गोष्टा सातत्याने घडल्या गेल्या पाहिजेत. खेळाडूंमध्ये खूप मैत्रीपूर्ण वातावर आहे. त्यांना आता एकच ड्रेसिंग रूम शेअर करण्याची संधी मिळत आहे.'

Shahid Afridi recalled went to India for the World Cup
Virat Kohli: विराटनं सिक्स मारले याचे दु:ख नाही, पण पांड्यानं... पाकिस्तानी बॉलर हारिस रऊस बोलून गेला

इंग्लंडने टी 20 वर्ल्डकपपूर्वी पाकिस्तानचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी टी 20 सामन्यांची मालिका खेळली होती. या दोन्ही संघातच टी 20 वर्ल्डकपची फायनल देखील झाली होती. आता कसोटी दौऱ्यात पहिला कसोटी सामना रावळपिंडी येथे होणार आहे. तर दुसऱा सामना मुल्तान आणि तिसरा कराची येथे खेळवला जाणार आहे.

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com