World Cup 2019 : रंकाचा राव.. बेन स्टोक्स अन् गप्तिल हिरोचा..झिरो

World Cup 2019 : रंकाचा राव.. बेन स्टोक्स अन् गप्तिल हिरोचा..झिरो

वर्ल्ड कप 2019 : खेळात तुम्ही कितीही गुणवान, धैर्यवान असलात तरी तुमचा दिवस असावा लागतो. विजयाचा उन्माद बाळगायचा नसतो किंवा पराभव आथवा अपयशाने खचून जायचे नसते. अपना भी टाईम आयेगा....या प्रमाणे त्या दिवसाची वाट पहायची असतो असाही एकद दिवस येतो की जो तुम्हाला रंकाचा राव करणारा ठरतो. बेन स्टोक्स हे चांगलेच जाणतो. 

3 एप्रिल 2016 या दिवशी बेन स्टोक्स इंग्लंडसाठी झिरो झाला होता पण 14 जुलै 2019 रोजी तो हिरो झाला....दोन्ही विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे अंतिम सामने होते, पहिला होता ट्वेन्टी-20 चा तर दुसरा त्याहूनही अधिक महत्वाच्या प्रतिष्ठेच्या एकदिवसीय क्रिकेटच्या विश्वकरंडकाचा. एका खेळीत त्याने सर्व अपयश धुवून काढले.

अठवतोय ना तीन वर्षांपूर्वीच्या कोलकत्यातील ऐतिहासित ईडन गार्डनवरील टेन्टी-20 स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंडला विजेता होण्याचा अवकाश बाकी होता पण ब्राथवेटने स्टोक्सचे सलग चार चेंडू षटकार ठोकून स्टोक्ससाठी होत्याचे नव्हते केले होते. पण काल 14 जुलै रोजी स्टोक्सची अखंड डावातील 84 धावांची खेळ इंग्लंडसाठी जीवदान देणारी ठरलीच पण सुपर ओव्हरमध्ये त्याने मारलेला षटकारही मौल्यवान ठरला. त्यापेक्षा त्याच्या बॅट लागून गेलेला ओव्हर थ्रोचा चौकार नियती हिरो बनवत होती हे सत्य नाकारता येणार नाही तेव्हा कितीही अपयश आले तरी खचून जायचे नाही, एक दिवस येतो जो तुम्हाला पुन्हा हिरो ठरवण्याची संधी देत असतो...

काय कमाल असते पहा स्टोक्स हा खर तर न्यूझीलंच्या ख्राईस्टचर्च शहरात जन्मलेला पण त्याने ही अविस्मरणीय खेळी त्याच्या जन्मदात्या देशाशाविरुद्धच केली. यापुढे स्टोक्स अनेक निर्णायक किंवा संघाच्या विजयात मोलाचे योगदान देणाऱ्या खेळी करेल पण काल केलेली खेळी तोच काय अख्खे इंग्लंड कधीच विसरणार नाही.

कमनशिबी गुप्तील
रंकाचा राव होण्यासाठी स्टोक्सला तीन वर्षे वाट पहावी लागली पण मार्टिन गप्तिल पाच दिवसातच हिरोचा झिरो झाला. संपूर्ण स्पर्धेत फलंदाज म्हणून अपयशी ठरलेल्या गप्तिलने एका अचुक फेकीमुळे न्यूझीलंड संघाचे नशिब पालटले होते. भारताविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडकडून इतरही निर्णायक खेळी झाल्या पण सर्वात वरचा क्रमांक गप्तिलने धोनीला धावचीत करताना केलेला अचुक थ्रोचा होता. रविवारी काय झाले ? थ्रो नेच गप्तिलचा घात केला आणि धावचीतनेच त्याला झिरो ठरवले. याला काव्यगत न्याय असेही म्हटले जाते, त्यामुळे खेळात प्रत्येक दिवस नवा असतो तुम्हाला सदैव तत्पर रहावे लागण्याचा धडा देत असतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com