मुलींनो जिंकलंत...! तुमच्या खिलाडूवृत्तीला Hats Off

शैलेश नागवेकर
Monday, 26 August 2019

सिंधू दुःखी झाली होती पण ती खचली नव्हती. स्वतःला सावरत होते त्यातच तिने कॅरोलिनाची रॅकेट उचलून तिला दिली. अलिंगन देत तिचे अभिनंदन केले होते. सुवर्णपदकापेक्षा त्या क्षणाने सर्वांची मने जिंकली होती. सिंधूच्या हातून सुवर्ण निसटले असले तरी तिची ती कृती अभिमानास्पद होती.

रिओ ऑलिंपिक महिला बॅटमिंटनमध्ये पी. व्ही. सिंधू आणि कॅरोलिना मरिन यांच्यातला अंतिम सामना..सर्व भारतीयांचे लक्ष एकवटलेले...कमालीचा खेळ करणाऱ्या सिंधूनकडून सुवर्णपदकाची अपेक्षा ताणलेली, पण थोडक्यात यशाने  हुलकावणी दिली. दुसरीकडे कॅरोलिना विजयाने भारावलेली होती. पण विजयाच्या उन्मादाचा लवलेशही नव्हता आनंदाश्रू तरळत होतेच. तिच्या हातातील रॅकेट बाजूला पडली होती. सिंधू दुःखी झाली होती पण ती खचली नव्हती. स्वतःला सावरत होते त्यातच तिने कॅरोलिनाची रॅकेट उचलून तिला दिली. अलिंगन देत तिचे अभिनंदन केले होते. सुवर्णपदकापेक्षा त्या क्षणाने सर्वांची मने जिंकली होती. सिंधूच्या हातून सुवर्ण निसटले असले तरी तिची ती कृती अभिमानास्पद होती.

दरम्यानच्या काळात सिंधू-कॅरोलिना यांच्यात अनेक सामने झाले, कधी कधी दोघींच्या आई सामन्यांना हजर असायच्या. एका स्पर्धेत सिंधू जिंकली त्यावेळी कॅरोलिनाच्या आईने सिंधूबरोबर सेल्फी काढला होता. हा प्रसंग केवळ हातातील मोबाईलमध्ये छबी टिपण्याएवढाच मर्यादित नाही तर आपाल्या मुली एकमेकींच्या प्रतिस्पर्धी असल्या तरी मैत्रीचे बंध कूटूंबातही झिरपण्या इतक्या रेशिमगाठी भावनिक आहेत. 

नुकत्याच संपलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कॅरोलिना दुखापतीमुळे खेळली नाही, पण तिचे लक्ष या स्पर्धेवर होते. सिंधूने प्रथमच ऐतिहासिक यश मिळवले आणि लगेचच कॅरोलिनाने ट्विटकरून केवळ औपचारिकता म्हणून सिंधूचे अभिनंदन केले नाही. तर `अभिमान` हा शब्द वापरला यालाच म्हणतात आदर !

सिंधूने खिलाडूवृत्तीचे हे बिज रोवले आणि आता ते अख्य़ा  बॅटमिंटन क्षेत्रात पससले आहे. सिंधूकडून पराभूत झालेल्या जपानचा ओकूहाराने सामन्यानंतर लगेचच सिंधूबरोबर सेल्फी काढला. थोडक्यात काय तर आपल्याला हरवणाऱ्या प्रतिस्पर्धीच्याही आनंदात सहभागी होणे हा नवा आदर्श या अव्वल महिला बॅडमिंटनपटू संपूर्ण क्रीडा क्षेत्राला घालून दिला आहे. क्रिकेटला सभ्यगृहस्थांचा खेळ म्हणून संबोधले जायचे पण आता ही व्याख्या बदलायला हवी. 

विराटही ठरतोय आदर्श

हल्लीच्या युगात जिंकण्यासाठी वाट्टेल ते करण्याचा प्रयत्न केला जातो. स्टीव स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि बॅक्रॉफ्ट यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी जिंकण्यासाठी चेंडू कूरतडला त्याची शिक्षा त्यांना भोगावी लागली याच स्मिथची विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय प्रेक्षकांनी हूर्यो उडवली तेव्हा विराटने पुढे येऊन या प्रेक्षकांना असा गैरप्रकार न करण्याची सुचना केली. त्यानंतर स्मिथने विराटला केलेले हस्तांदोन सर्व काही स्पष्ट करणारे होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shailesh Nagwekar writes about sportsmanship of badminton players