Shakib Al Hasan : युद्धात असताना... मॅथ्यूजविरूद्धची अपील मागे न घेण्याबद्दल शाकिब काय म्हणाला?

Shakib Al Hasan
Shakib Al Hasanesakal

Shakib Al Hasan Angelo Mathews Time Out Controversy : बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात दिल्लीत झालेल्या सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेवर 3 विकेट्सनी विजय मिळवला. हा त्यांचा यंदाच्या वर्ल्डकपमधील सलग सहा पराभवानंतरचा पहिला विजय ठरला. वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेने पहिल्यांदाच श्रीलंकेला पराभवाची धूळ चारली.

मात्र या सामन्याला गालबोट लागलं. बांगलादशेचा कर्णधार शाकिब अल हसनने अँजेलो मॅथ्यूजविरूद्ध टाईम आऊटची अपील केली अन् त्याला पंचांना बाद ठरवावं लागले. मॅथ्यूज हेलमेटची स्ट्रीप तुटल्यामुळे दुसरे हेलमेट घेण्यासाठी थांबला होता. त्यामुळे त्याला क्रीजवर यायला वेळ झाला.

Shakib Al Hasan
Time Out Controversy : टाइम आऊट प्रकरणी लंकेचे खेळाडू येणार गोत्यात, मॅथ्यूज अन् कर्णधारवर होणार कारवाई?

दरम्यान, मैदानावरील पंचांनी शाकिब अल हसनला दोनवेळा आपली अपील मागे घेण्याबाबत विचारणा केली मात्र शाकिबने अपील मागं घेण्यास नकार दिला. यावरून शाकिबवर जोरदार टीका होत होती. संपूर्ण सामन्यावर याचा परिणाम झाला. दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांना हस्तांदोलन न करताच निघून गेले.

शाकिबला या घटनेबद्दल सामन्यानंतर विचारण्यात आलं. त्यावेळी शाकिब म्हणाला की, 'मॅथ्यूजला मैदानावर यायला उशीर होतोय हे पाहून आमच्या संघातील एक फिल्डर म्हणाला की जर तू आता अपील केलंस तर तो बाद होईल.आयसीसीचा तसा नियम आहे.'

'मला माहिती नाही की हे चूक की बरोबर मात्र आम्ही युद्धात आहोत आणि मला माझा संघ जिंकावा यासाठी काही निर्णय घ्यायचा होता. हे चूक का बरोबर हा चर्चेचा विषय असू शकतो. जर हा नियम आहे तर त्याचा वापर करण्यासाठी मी मागे हटणार नाही.'

Shakib Al Hasan
T20 Cricket : सांगलीच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबदबा; झेक रिपब्लिक देशासाठी श्रेयानं केली शानदार कामगिरी

दरम्यान, मॅथ्यूजने देखील शाकिबचा बदला घेतला. त्याने 65 चेंडूत 82 धावा करणाऱ्या शाकिबला बाद केलं अन् हातातलं घड्याळ दाखवलं. मात्र या सर्व प्रकरणामुळे बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात एक विखारी राव्हलरी सुरू झाली आहे.

(Sports Latest News)

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com