Shane Warne : शेन वॉर्नच्या १२० कोटींच्या मालमत्तेची वाटणी, पत्नी सोडून सर्वांना...

Shane Warne
Shane Warne

Shane Warne : ऑस्ट्रेलियाचा जादुई फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने ४ मार्च २०२२ रोजी अखेरचा श्वास घेतला होता. त्याच्या निधनानंतर क्रिकेटविश्वात एक पोकळी निर्माण झाली होती. शेन वॉर्न जवळपास १२० कोटी रुपयांची संपत्ती मागे सोडून गेला आहे.

शेन वॉर्नच्या मृत्यूच्या ११ महिन्यांनंतर शेन वॉर्नच्या मालमत्तेच्या वितरणाशी संबंधित मोठी बातमी समोर आली आहे. शेन वॉर्नच्या मालमत्तेची विभागणी झाली असून, त्यात त्याच्या माजी पत्नीचा १ रुपया देखील मिळाला नाही. 

शेन वॉर्नचे मृत्यूपत्र नुकतेच उघड झाले आहे, ज्यामध्ये असे कळले आहे की, मरण्यापूर्वी वॉर्नने त्याची १२० कोटी रुपयांची संपत्ती त्याच्या तीन मुलांमध्ये समान वाटून दिली आहे. यामध्ये त्याच्या पत्नीला एक रुपया देखील मिळाला नाही. 

Shane Warne
Ranji Trophy: संघातुन बाहेर गेलेल्या सलामीवीराचं BCCIला चोख प्रत्युत्तर! ठोकल्या 33 चेंडूत 142 धावा

वॉर्न तिघांना त्याच्या संपत्तीपैकी ३१-३१ टक्के वाटप केले. याशिवाय उर्वरित भाग त्यांनी पुतण्या आणि भाचीला दिला. जॅक्सन, ब्रुक आणि समर नावाच्या त्यांच्या मुलांना ३१-३१ टक्के मालमत्ता मिळाली. 

शेन वॉर्नला बाइक आणि कारची खूप आवड होती. त्याच्याकडे बाईक आणि कारचाही मोठा संग्रह होता. त्याला बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज कारची आवड होती. या सर्व वाहनांना त्याने त्यांच्या मुलगा जॅक्सनचे नाव दिले आहे.

Shane Warne
IND vs AUS 1st Test Live: भारतीय सलामी जोडीची दणक्यात सुरूवात; रोहितचा आक्रमक पवित्रा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com