शेन वॉर्नच्या मृत्यू प्रकरणात तीन वर्षांनंतर मोठा खुलासा झाला आहे. त्याच्या मृत्यूवेळी घटनास्थळावर ‘कामाग्रा’ नावाच्या औषधाची बाटली आढळल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले आहे. इतकेच नाही, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला ही बाब बाहेर सांगण्यास मनाई केल्याचेही त्याने म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणी आता विविध चर्चांना उधाण आले आहे.