Shane Warne First International Ball to Sanjay Manjrekar
Shane Warne First International Ball to Sanjay Manjrekar esakal

VIDEO: वॉर्नने कारकिर्दितल्या पहिल्याच चेंडूवर मांजरेकरांचा केला होता 'झुलता पूल'

ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न (Shane Warne) हा क्रिकेट इतिहासातील एक दर्जेदार लेग स्पिनर म्हणून ओळखला जात होता. त्याचे 4 मार्चला थायलंड येथे ह्रदय विकाराचा झटका आल्यानं मृत्यू झाला. अवघ्या 52 व्या वर्षी शेन वॉर्नने जग सोडले. वॉर्नच्या एक्झीटवर क्रीडा विश्वातील सर्व लोकांनी हळहळ व्यक्त केली. कारण शेन वॉर्न लेग स्पिनचं एक विद्यापीठ होतं. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1000 जास्त विकेट्स घेतल्या होत्या. शेन वॉर्नने आपल्या कारकिर्दिची सुरूवात ही भारताविरूद्ध 1992 मध्ये केली होती.

Shane Warne First International Ball to Sanjay Manjrekar
VIDEO : सर जडेजाचे शतक; कॅमेरा फिरला 'या' दोन महिलांवर

भारत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असताना सिडनी कसोटीत शेन वॉर्नने पदार्पण केले होते. यावेळी त्याने आपला पहिला आंतरराष्ट्रीय चेंडू (Shane Warne's First Over In International Cricket) हा भारताचे माजी फलंदाज संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांना टाकला होता. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्याने पहिल्याच चेंडूवर संजय मांजरेकरांना चकवले होते. मांजरेकरांना वॉर्नचा चेंडू पुढे खेळू की मागे खेळू हेच कळले नाही. वॉर्नचा चेंडू इतका वळला होता की मांजरेकरांनी आपली बॅट नुसतीच झुलवली. वॉर्नच्या या लेगस्पिनने मांजरेकरांना बुचकळ्यात टाकले.

Shane Warne First International Ball to Sanjay Manjrekar
Shane Warne Greatness: ऑस्ट्रेलियाच्या वॉर्नसाठी भारत, श्रीलंकेचे मौन

शेन वॉर्नला आपल्या पदार्पणाच्या कसोटीत फक्त एक विकेटच घेता आली. मात्र त्यांनी द्विशतक ठोकणाऱ्या रवी शास्त्रींची विकेट (Shane Warne First International Wicket) घेऊन आपली आंतरराष्ट्रीय कारकिर्द सुरू केली होती. रवी शास्त्रींनी (Ravi Shastri) सिडनी कसोटीत 206 धावांची द्विशतकी खेळी केली होती. त्याची विकेट शेन वॉर्नने घेतली होती. यानंतर शेन वॉर्नने मागे वळून पाहिले नाही. त्याने आपल्या कारकिर्दीत 35 वेळा एका डावात 5 विकेट घेण्याची कमगिरी केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com