VIDEO : सर जडेजाचे शतक; कॅमेरा फिरला 'या' दोन महिलांवर

Watch Ravindra Jadeja sword celebration after Century against Sri Lanka
Watch Ravindra Jadeja sword celebration after Century against Sri Lanka esakal

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) दमदार शतक ठोकून भारताला 450 धावांचा टप्पा पार करून दिला. रविंद्र जडेजा पहिल्या दिवशी 45 धावा करून नाबाद होता. त्याने दुसऱ्या दिवशी आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतर त्याने आपला वेग वाढवत शतकाकडे कूच केली. अखेर लंच होण्यापूर्वी त्याने आपले कसोटीतील दुसरे कसोटी शतक पूर्ण केले.

Watch Ravindra Jadeja sword celebration after Century against Sri Lanka
Shane Warne Greatness: ऑस्ट्रेलियाच्या वॉर्नसाठी भारत, श्रीलंकेचे मौन

शतक पूर्ण झाल्यानंतर रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) आपल्या नेहमीच्या तलवारबाजीच्या स्टाईलने सेलिब्रेशन (Sword Celebration) केले. या सेलिब्रेशनचा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला. या व्हिडिओत जडेजा शतकाचे सेलिब्रेशन करत असताना कॅमेरा प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या दोन महिलांवर खिळला. यातील एक महिला रविंद्र जडेजाची पत्नी (Ravindra Jadeja Wife) रिवा असण्याची शक्यता आहे.

Watch Ravindra Jadeja sword celebration after Century against Sri Lanka
Shane Warne: शेन वॉर्नच्या मृत्यूपूर्वी २० मिनिटांमध्ये थायलंडमध्ये काय घडले?

भारत आणि श्रीलंका ( India vs Sri Lanka) यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने 6 बाद 357 धावांपासून पुढे खेळण्यास सुरूवात केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी रविंद्र जडेजा 45 धावांवर तर रविचंद्रन अश्विन 10 धावा करून नाबाद होते. जडेजाने दुसऱ्या दिवशी लंचपर्यंत शतकी मजल मारली. तर अश्विनने देखील 61 धावांची अर्धशतकी खेळी करून जडेजाला चांगली साथ दिली. लंचसाठी खेळ थांबला त्यावेळी भारताच्या 7 बाद 468 धावा झाल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com