Ishan Kishan : इशानने पटनावरून झिम्बावेला पोहचलेल्या फॅनला विचारलं, इथं काय करतोय? - Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ishan Kishan Fans Came From Patna To Zimbabwe

Ishan Kishan : इशानने पटनावरून झिम्बावेला पोहचलेल्या फॅनला विचारलं, इथं काय करतोय? - Video

Ishan Kishan Fans Came From Patna To Zimbabwe : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका उद्यापासून सुरू होत आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारताचा युवा संघ हरारेमध्ये जोरदार सराव करत आहे. भारतीय स्टार मैदानात सरावासाठी दाखल झाले तेव्हा त्यांना पाहण्यासाठी अनेक चाहते स्टेडियमच्या गेटवर जमा झाले होते. एका चाहत्या थेट पाटणाहून इशान किशनला खेळताना पाहण्यासाठी झिम्बाब्वेला आला आहे. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे.

चाहत्या इशानला नेटमध्ये फलंदाजी करताना पाहण्यासाठी तो मंगळवारी सराव मैदानावर पोहोचला होता. स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या एका दिग्गज क्रीडा पत्रकारासमोर त्यांनीच हा खुलासा केला. चाहत्याने सांगितले की, पाटण्यातील इशानच्या घरापासून फक्त पाच ते दहा किलोमीटर अंतरावर आहे.

हेही वाचा: ZIM vs IND : झिम्बावेच्या खेळाडूंना मिळतात महिन्याला फक्त 1100 रूपये

चाहत्याने सांगितले की, माझे नाव आशिष आहे. मी पाटणाचा रहिवासी आहे आणि इशान किशन आणि भारतीय संघाला सपोर्ट करण्यासाठी येथे आलो आहे. आम्हाला खेळाडूंचा सराव करताना बघायला मिळत आहे याचा आम्हा सर्वांना खरोखरच आनंद आहे. इशान चेंज रूमकडे जात असताना आशिष ओरडतो इशान भाई… पटना, पटना! मी यशस्वीचा मित्र आहे. यावर ईशान म्हणतो- मग तू इथे काय करतोस? यानंतर ईशानने चाहत्यांसोबत फोटोही काढले.

हेही वाचा: Asia Cup 2022 : मालिकेवर फोकस करा! IND vs PAK सामन्यापूर्वी गांगुलीचा रोहितला सल्ला

केएल राहुलच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ झिम्बाब्वेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. पहिला वनडे 18 ऑगस्ट, दुसरा 20 ऑगस्ट आणि तिसरा 22 ऑगस्टला खेळवला जाईल. हे तिन्ही सामने हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये होणार आहेत. केएल राहुल दीर्घकाळानंतर अॅक्शनमध्ये उतरणार आहे. या महिन्यात सुरू होणाऱ्या आशिया चषकापूर्वी अनेक खेळाडू गती शोधण्याचा प्रयत्न करतील. ईशानची आशिया कप संघात निवड करण्यात आलेली नाही तर अक्षर स्टँडबाय खेळाडू म्हणून संघासोबत प्रवास करेल. यावेळी आशिया चषक युएईमध्ये होणार आहे.

Web Title: Ishan Kishan Fans Came From Patna To Zimbabwe To Meet Viral Video Ind Vs Zim Odi 2022 Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..