Virat Kohli : खराब फॉर्मवर विराटने तोडले मौन, म्हणाला- 'टप्प्यातून गेल्याशिवाय...' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Asia Cup 2022 IND vs PAK Virat Kohli

Virat Kohli : खराब फॉर्मवर विराटने तोडले मौन, म्हणाला- 'टप्प्यातून गेल्याशिवाय...'

Virat Kohli Asia Cup 2022 IND vs PAK : भारताचा माजी कर्णधार विराट कोहली गेल्या काही दिवसांपासून खराब फॉर्ममधून जात आहे. नोव्हेंबर 2019 पासून कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक करता आले नाही. गेल्या महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर तो ब्रेकवर आहे. आता विराट टीम इंडियात परत आशिया चषक स्पर्धेत जोरदार धावा करण्यासाठी सज्ज झाला आहे. कोहलीने स्पर्धेपूर्वी आपल्या फॉर्मबद्दल की त्याच्या फलंदाजीत कोणतीही अडचण नाही. वाईट अवस्थेतून तो लवकरच बाहेर येईल, असा त्याला विश्वास आहे.

हेही वाचा: Shubman Gill Sara Tendulkar : शुभमन अन् साराच ब्रेकअप? इन्स्टाग्रामवर एकमेकांना केले अनफॉलो

विराट स्टार स्पोर्ट्स शोमध्ये म्हणाला, मी काय करत आहे हे मला माहीत आहे. खडतर परिस्थिती आणि वेगळ्या गोलंदाजीचा सामना करण्याची तुमची तयारी नसेल, तर तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतक्या पुढे जाऊ शकत नाही. ही माझ्यासाठी सोपी आहे, परंतु मी ती माझ्या मागे ठेवू इच्छित नाही. मला यातून शिकायचे आहे. मला माहित आहे की तेथे चढ-उतार असतील. मीही या टप्प्यातून बाहेर येईन. माझा अनुभव माझ्यासाठी खास आहे.

हेही वाचा: Asia Cup 2022 साठी व्हीव्हीएस लक्ष्मण हंगामी मुख्य प्रशिक्षक; BCCIचं शिक्कामोर्तब

आशिया चषक स्पर्धेत क्रिकेटमधून विश्रांती घेतल्यानंतर कोहलीच्या संघात पुनरागमन करण्याकडे सर्वांचे लक्ष आहे. विराट गेल्या काही काळापासून खराब फॉर्मशी झुंज देत आहे. या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी आशिया चषकात फॉर्ममध्ये परतण्याची त्याच्याकडे सुवर्ण संधी आहे. त्याने आयपीएल 2022 च्या 16 डावांमध्ये 22.73 च्या सरासरीने 341 धावा केल्या. या स्पर्धेत टीम इंडियाला विराटकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

Web Title: Asia Cup 2022 Ind Vs Pak Virat Kohli Breaks His Silence On Poor Form Ahead Of India Vs Pakistan Clash Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..