esakal | फेसबुकवरुन सुरु झालेल्या लव्ह स्टोरीचा इंस्टावर 'दि एन्ड'
sakal

बोलून बातमी शोधा

Shikhar Dhawan  and Aesha Mukerji

फेसबुकवरुन सुरु झालेल्या लव्ह स्टोरीचा इंस्टावर 'दि एन्ड'

sakal_logo
By
सुशांत जाधव

आयुष्य ऊन पावसाच्या खेळासारखे असते. हे उदाहरण क्रिकेटच्या खेळालाही लागू होत. चढ-उतारांच्या क्षणांनी आयुष्य पुढे सरकत असते. काही वेळा ज्या गोष्टी आनंदाच्या शिखरावर घेऊन जातात त्याच गोष्टीमुळे माणूस दुख:च्या खाईत येऊन पोहचतो. हीच गोष्ट सध्या भारतीय संघातील धडाकेबाज फलंदाज शिखर धवनच्या बाबतीत घडताना दिसते. ज्या अनोख्या प्रेमाची जोरदार चर्चा झाली. त्या प्रेमासोबतची त्याची इनिंग संपुष्टात आलीये.

शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि आऐशा मुखर्जी (Aesha Mukerji) यांच्या प्रेमाला फेसबुकवरुन सुरुवात झाली. आऐशाचा जन्म पश्चिम बंगालमध्ये झाला असला तरी ती 8 वर्षांची असताना तिचे कुटुंबिय ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये स्थायिक झाले. आऐशा ही स्वत: किक बॉक्सिंग खेळात हात आजमावलेली खेळाडू आहे. तिला खेळाची आवडही आहे. भज्जी अर्थात हरभजन सिंग आणि आऐशा एकमेकांचे मित्र होते. भज्जी ज्यावेळी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचा तेव्हा न चुकता तो आऐशाला भेटायचा. हरभजन सिंगनेच एका दिवशी शिखर आणि आऐशा यांची भेट घडवून दिली होती.

...अन् तिने फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारली

पहिल्या भेटीतच आऐशाने शिखर धवनच्या मनात घर केले. त्याने तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. बॉक्सर आऐशा आपल्यासोबत मैत्री करायला तयार होईल का? असा प्रश्नही धवनच्या मनात आला होता. पण तो विचार बाजूला ठेवत धवनने तिला फ्रेंड रिक्वस्टे पाठवली आणि फेसबुकच्या माध्यमातून मैत्रीला सुरुवात झाली. फेसबुक चॅटिंगवरचा खेळाचे प्रेमात रुपांतर झाले आणि शिखर धवनने तिच्यासोबत आयुष्याच्या नव्या इनिंगला सुरुवात करण्याचा निर्णयही घेतला.

हेही वाचा: प्रेम, लग्न, घटस्फोट.. शिखर धवनची पत्नी आयेशाबद्दल काही खास गोष्टी

... आऐशासोबत लग्नानंतर धवनची कामगिरीही बहरली

आऐशा ही शिखर धवनपेक्षा 10 वर्षांनी मोठी तर होतीच. पण ती घटस्फोटीत होती आणि तिला दोन मुलीही होत्या. त्यामुळे शिखर धवनने ज्यावेळी तिच्याशील लग्न करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी सर्वांच्याच भुवय्या उंचावल्या होत्या. आईचा पाठिंबा असल्यामुळे त्याला आपल्या प्रेमाचे लग्नात रुपांतर करण्यात काहीच अडचण आली नाही. 2009 मध्ये या दोघांनी साखरपुडा केला. 2012 मध्ये धवन मेलबर्नचा जावई झाला. त्यानंतर त्याचे क्रिकेट कारकिर्दही बहरल्याचे पाहायला मिळाले. भारतीय संघाचा तो एक नियमित सदस्य झाला.

हेही वाचा: शिखर धवनचा 9 वर्षांनी घटस्फोट? पत्नीची पोस्ट होतेय व्हायरल

फेसबुकवरील प्रेम लग्नानंतर इन्स्टावर झाले एन्ड

2020 पासूनच धवन आणि आऐशा यांच्यात मतभेद सुरु असल्याची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली होती. दोघांनी सोशल मीडियावरुन एकमेकांना अनफॉलो केले. आऐशा तर त्याच्यावर इतकी नाराज होती की तिने सोशल मीडियावरुन धवनचे सर्व फोटो काढून टाकले होते. त्यामुळेच दोघांमधील दूरावा कमी होणार नाही याची चर्चा रंगली. इंस्टाग्रामच्यामाध्यमातून पोस्ट शेअर करत अखेर आऐशाने दुसरी इनिंगही ब्रेक झाल्याची माहिती दिली. शिखर धवनने फेसबुकवरुन सुरु केलेले नाते इन्टाग्रामच्या पोस्टने संपुष्टात आले.

loading image
go to top