esakal | अखेर धवनला वगळले; पुजारा, कुलदीप संघात
sakal

बोलून बातमी शोधा

अखेर धवनला वगळले; पुजारा, कुलदीप संघात

अखेर धवनला वगळले; पुजारा, कुलदीप संघात

sakal_logo
By
वृत्तसंस्था

लंडन : मालिकेमध्ये इंग्लंडला कडवी लढत देण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या लॉर्डस कसोटीमध्ये भारतीय संघाने अपेक्षेनुसार तंत्रशुद्ध फलंदाज चेतेश्‍वर पुजाराला संघात स्थान देताना सूर हरपलेल्या शिखर धवनला वगळले. तसेच, इंग्लंडच्या फलंदाजांना अडचणीत आणण्यासाठी डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवलाही संधी मिळाली आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाज उमेश यादवला बाहेर बसावे लागले. दुसऱ्या क्रिकेट कसोटीमध्ये इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूटने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. 

लॉर्डस कसोटीमध्ये पहिल्या दिवशी पावसाचाच खेळ झाला होता. काल नाणेफेकही होऊ शकली नव्हती. 

इंग्लंडच्या संघात अष्टपैलू बेन स्टोक्‍सऐवजी ख्रिस वोक्‍सचा समावेश करण्यात आला आहे. तसेच, नवोदित ऑली पोपलाही संधी मिळाली आहे. इंग्लंडची भक्कम मधली फळी असल्याने कुलदीपच्या समावेशाने भारताच्या गोलंदाजीला धार आली आहे. 

पहिल्या कसोटीमध्ये विराट कोहलीचा अपवाद वगळता इतर कोणत्याही भारतीय फलंदाजाला तग धरता आला नव्हता. त्यामुळे गोलंदाजांनी चांगली कामगिरी केल्यानंतरही भारताला विजय मिळविता आला नव्हता. 

इंग्लंडचा संघ 
ऍलिस्टर कूक, किटन जेनिंग्ज, ज्यो रूट (कर्णधार), ऑली पोप, जॉनी बेअरस्टॉ (यष्टिरक्षक), जोस बटलर, ख्रिस वोक्‍स, सॅम करन, आदिल रशीद, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन 

भारतीय संघ 
मुरली विजय, के. एल. राहुल, चेतेश्‍वर पुजारा, विराट कोहली (यष्टिरक्षक), अजिंक्‍य रहाणे, दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), हार्दिक पांड्या, आर. आश्‍विन, कुलदीप यादव, महंमद शमी, ईशांत शर्मा 

loading image
go to top