esakal | नवरा-बायकोचं नातं तुटंल; बाप-लेकाचं प्रेम कायम!
sakal

बोलून बातमी शोधा

Shikhar Dhavan

नवरा-बायकोचं नातं तुटंल; बाप-लेकाचं प्रेम कायम!

sakal_logo
By
सुशांत जाधव

भारतीय संघातील अनुभवी शिखर धवन (Shikhar Dhawan) धक्क्यावर धक्के बसल्याचे पाहायला मिळाले. शिखर धवन आणि आऐशा मुखर्जी (Ayesha Mukherjee) यांच्यात घटस्फोट झाला. त्यानंतर वर्ल्ड टी-20 वर्ल्ड कप संघासाठी भारतीय संघातूनही त्याचा पत्ता कट झाला. आयुष्यातील चढ-उताराचा सामना करत असतानाही शिखर धवन कूल आहे. सध्याच्या घडीला तो युएईत रंगणाऱ्या आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेमध्ये व्यस्त आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या या सलामीवीराची एक इन्टा स्टोरी चांगलीच चर्चेत आहे.

आऐशापासून विभक्त झाल्यानंतर धवनने नुकतेच आपल्या मुलगा झोरावर याच्याशी संवाद साधला. आयपीएलच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून बाप लेकांची भेट झाली. धवनने इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून हा क्षण शेअर केल्याचे पाहायला मिळाले. माझ्यासाठी हा क्षण खूप खास आहे, अशा कॅप्शनसह धवनने हा फोटो शेअर केला होता. या फोटोतून बाप-लेकातील प्रेम अजून आटलेलं नाही, असेच पाहायला मिळते.

हेही वाचा: "...तर अजिंक्य रहाणेला सरळ 'धन्यवाद' म्हणा अन् घरी पाठवा"

शिखर धवन आणि आयेशा मुखर्जी 9 वर्षांनंतर एकमेकांपासून वेगळे झाले. त्याची पत्नी आऐशाने एका इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली. त्यानंतर धवनने सोशल मीडियाच्या माध्यमातूनच या बातमीला दुजोरा दिला होता. धवनच्या प्रेम कहाणीची सुरुवात ही फेसबुकच्या माध्यमातून झाली होती. पहिल्यांदा धवनने आऐशाला फ्रेंड रिक्वेस पाठवून तिच्याशी मैत्री केली. या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. पहिल्यांदाच घटस्फोटित असलेल्या आऐशाला दोन मुली होत्या. धवनपेक्षा ती 10 वर्षांनी मोठी होती. तरीही धवनने तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय़ घेतला होता.

loading image
go to top