esakal | "तर रहाणेला 'धन्यवाद' म्हणा अन् घरी पाठवा"; माजी खेळाडूचं रोखठोक मत
sakal

बोलून बातमी शोधा

Ajinkya-Rahane

संपूर्ण इंग्लंड दौऱ्यात अजिंक्य रहाणेची खराब कामगिरी

"...तर अजिंक्य रहाणेला सरळ 'धन्यवाद' म्हणा अन् घरी पाठवा"

sakal_logo
By
विराज भागवत

"प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीत वाईट काळ असतो. त्या वाईट काळात तुम्ही तुमच्या खेळाडूशी कशाप्रकारे वागता हे महत्त्वाचे आहे. तुम्ही त्याला वाऱ्यावर सोडता की त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहता, याकडे साऱ्यांचे लक्ष असते. माझं असं वैयक्तिक मत आहे की अजिंक्य रहाणेला आगामी कसोटी मालिकेतही संधी देण्यात यायला हवी. पण जर त्याची त्यावेळीही कामगिरी उंचावलेली नसेल तर मात्र तुम्ही त्याला 'धन्यवाद' म्हणून थेट घरी पाठवा", असं सडेतोड मत भारताचा स्फोटक माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग याने व्यक्त केले. तो एका क्रीडा वाहिनीवरील कार्यक्रमात बोलत होता.

हेही वाचा: "फालतू गप्पा नकोत, T20 World Cup कडे लक्ष द्या"; BCCIची ताकीद

"आणखी महत्त्वाचे म्हणजे ज्यावेळी तुमची परदेश दौऱ्यावरील कामगिरी खालावलेली दिसते, त्यावेळी तुम्हाला भारतातील एखाद्या मालिकेसाठी संधी देण्यात यायला हवी. कारण परदेशातील दौरे हे मायदेशातील क्रिकेट मालिकांच्या तुलनेत कमी असतात. जर तुम्हाला परदेशात चांगल्या धावा करता आल्या नाहीत, तर तुम्हाला मायदेशात संधी मिळाली पाहिजे. पण जर मायदेशातही तुम्हाला धावा करणं जमत नसेल, तर मात्र मला वाटतं की त्या खेळाडूला संघातून बाहेर करणंच योग्य आहे", असे सेहवाग म्हणाला.

Virender-Sehwag

Virender-Sehwag

हेही वाचा: "कोण होता तो क्रिकेटर.. त्याला माझ्यासमोर आणा"; गावसकर संतापले

"मी असे अनेक महान खेळाडू पाहिले आहेत जे ८-९ कसोटी सामन्यांमध्ये अतिशय खराब कामगिरी करतात. त्यांना साधं अर्धशतकही झळकावता येत नाही. पण एखाद्या सामन्यात त्यांना सूर गवसतो आणि मग ते पुढच्या एका वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये १२०० ते १५०० धावांचा टप्पा पार करतात", असं सांगत सेहवागने अजिंक्य रहाणेला एक संधी देण्यात यायला हवी असं मत मांडलं. पण, त्यातही तो अपयशी ठरला तर मात्र त्याला संघातून बाहेरचा रस्ताच दाखवला गेला पाहिजे असंही त्याने स्पष्ट केलं.

loading image
go to top