
Team India News: टीम इंडियातून दिग्गज खेळाडू बाहेर! BCCIला न सांगता बदलले करिअर?
Shikhar Dhawan News : भारतीय क्रिकेट संघाचा डावखुरा सलामीवीर शिखर धवनला सध्या टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटमधून वगळण्यात आले आहे.
निवडकर्त्यांनी त्याला कसोटी आणि टी-20 मधून आधीच वगळले होते, पण आता त्याला एकदिवसीय संघातूनही वगळण्यात आले आहे. धवन सध्या संघाबाहेर आहे आणि सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे जो त्याच्या टीव्ही डेब्यूकडे निर्देश करत आहे.
भारतीय संघाचा दिग्गज सलामीवीर शिखर धवन हा विनोदी आहे. त्याच्या अभिनयाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. शिखर धवनने आता कुंडली भाग्य या टीव्ही सीरियलमध्ये काम केल्याची बातमी चर्चेत आहे.
मालिकेच्या सेटवरून अनेक फोटो समोर आली आहेत, ज्यामध्ये शिखर धवन पोलिसांच्या ड्रेसमध्ये गुंडांना मारहाण करताना दिसत आहे.(Latest Marathi News)
शिखर धवनचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे ज्यामध्ये तो सिंघम स्टाईलमध्ये गुडींना मारत आहे. टीव्हीवरील लोकप्रिय मालिका कुंडली भाग्य स्टार अंजुम फकीहने शिखर धवनसोबतचे तिचे काही फोटो शेअर केले आहेत. (Marathi Tajya Batmya)
समोर आलेल्या फोटोमध्ये भारतीय सलामीवीर पोलिसांच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. अभिनेत्रीसोबतच को-स्टार अभिषेक कपूरही तिच्यासोबत दिसत आहे.
अंजुम फकीहसोबत शिखर धवननेही त्याच्या सोशल अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ एका टीव्ही सीरियलच्या सेटवर शूट करण्यात आल्याचे समजते. व्हिडिओमध्ये शिखर धवन पोलिस अवतारात गुंडांना मारहाण करताना दिसत आहे.