esakal | INDvsNZ : शिखर धवन न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेर; हे तीन पर्याय

बोलून बातमी शोधा

Shikhar Dhawan

भारतीय क्रिकेट संघ सोमवारी न्यूझीलंड दौऱ्यासाठी रवाना झाला. या संघासोबत शिखर धवन गेलेला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यानंतर तो फलंदाजीसही उतरला नव्हता.

INDvsNZ : शिखर धवन न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेर; हे तीन पर्याय
sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा सलामावीर शिखर धवन याला खांद्याच्या दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-20 दौऱ्यातून बाहेर जावे लागले आहे. त्याच्याजागी अद्याप कोणाची निवड करण्यात आलेली नाही.

भारतीय क्रिकेट संघ सोमवारी न्यूझीलंड दौऱ्यासाठी रवाना झाला. या संघासोबत शिखर धवन गेलेला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यानंतर तो फलंदाजीसही उतरला नव्हता. आता तो संघातून बाहेर गेल्याचे निश्चित झाले आहे. भारतीय संघ या दौऱ्यात पाच टी-20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

धवनला अनेकवेळा दुखापतीमुळे संघाबाहेर राहावे लागलेले आहे. आता पुन्हा एकदा ऐन भरात असताना त्याला दुखापतीने संघाबाहेर राहावे लागणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अद्याप त्याच्या जागी बदली खेळाडूची निवड केलेली नाही. शुभमन गिल, मयांक अगरवाल आणि सूर्यकुमार यादव या तीन नावांची या जागेसाठी जोरदार चर्चा आहे. केएल राहुलने सलामीला येत आपली उपयुक्तता सिद्ध केल्याने धवनच्या जागी बदली खेळाडूची निवड करण्यास बीसीसीआय विलंब करत आहे.