Shikhar Dhawan : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शिखर धवन भारतीय संघाचे करणार नेतृत्व?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेत शिखर धवन भारतीय संघाचा कर्णधार...
shikhar dhawan
shikhar dhawansakal

Shikhar Dhawan : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेत शिखर धवन भारतीय संघाचा कर्णधार होणार आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकाच्या संघात समाविष्ट असलेल्या भारताच्या सर्व खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत शिखर धवनला कर्णधारपद देण्यात येणार आहे. याशिवाय या मालिकेत व्हीव्हीएस लक्ष्मणला भारताचे प्रशिक्षक बनवले जाऊ शकते.

shikhar dhawan
VIDEO : पाकिस्तानच्या पराभवानंतर रमीझ राजा संतापला; भारतीय पत्रकाराशी केले भांडण

यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. याआधी 28 सप्टेंबरपासून भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. पहिला T20 सामना 28 सप्टेंबरला तिरुवनंतपुरममध्ये होणार आहे. दुसरा सामना 2 ऑक्टोबरला गुवाहाटी येथे खेळला जाणार आहे, त्यानंतर शेवटचा T20 सामना 4 ऑक्टोबरला इंदूरमध्ये होईल. एकदिवसीय मालिका लखनौमध्ये 6 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेत शिखर धवन भारताचा कर्णधार असणार आहे. वनडे मालिकेतील दुसरा सामना 9 ऑक्टोबरला रांचीमध्ये तर तिसरा सामना 11 ऑक्टोबरला दिल्लीत खेळला जाणार आहे.

shikhar dhawan
Asia Cup : अंतिम सामन्यात भारतीयांना पोलिसांकडून धक्काबुक्की; नाकारला प्रवेश

भारतीय संघाचे शिखर धवनने यापूर्वी अनेक वेळा नेतृत्व केले आहे. गेल्या वर्षी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत त्याला एकदिवसीय आणि टी-20 संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत धवनने त्याच्या नेतृत्वाखाली शानदार विजय मिळवला. झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही त्याला भारताचा कर्णधार बनवण्यात आले होते, पण नंतर लोकेश राहुल तंदुरुस्त झाला आणि धवनच्या जागी राहुलकडे भारतीय संघाची कमान सोपवण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com