Shivneri Kabaddi Mahotsav
esakal
दादर येथील भवानी माता क्रीडांगणावर सुरू असलेल्या ५८ व्या शिवनेरी कबड्डी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी खेळाडूंनी आक्रमक चढाया आणि भक्कम पकडींच्या जोरावर मैदान गाजवलं. कुमार गटात विजय क्लब आणि नवोदित संघाने दमदार विजय नोंदवले. विशेष म्हणजे, कबड्डीत दुर्मिळ होत चाललेल्या हनुमान उडीनेही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. साऊथ कॅनराच्या गुरुप्रसाद पंडितने या शैलीत चढाया केल्या, मात्र संघाला विजय मिळवता आला नाही. विजय क्लबने साऊथ कॅनराचा ४१-२१ असा पराभव केला.