
महाराष्ट्र केसरी स्पर्धेला यावेळी गोंधळाचे गालबोट लागले. उपांत्य फेरीत पृथ्वीराज मोहोळकडून पराभव झाल्यानंतर डबल महाराष्ट्र केसरी असलेला पैलवान शिवराज राक्षे याने थेट पंचांना लाथ मारली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्र्यांच्या उपस्थितीतच हा गोंधळ झाला. यानंतर पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यात अंतिम लढत झाली. यात पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी बनला आहे. मात्र यानंतर शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाडवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.