
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत राडा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गादी विभागातून नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यात उपांत्य फेरीचा सामना सुरू होता. यावेळी पंचानी दिलेला निर्णय शिवराज राक्षेला आवडला नाही. यामुळे त्याने गोंधळ घातल्याचे चित्र निर्माण झाले. यावरून वाद सुरू झाला, यात रागातून शिवराज राक्षेने पंचाना लाथ मारली. यानंतर वातावरण तापलं आहे. मात्र आता त्याने यावर स्पष्टीकरण दिले आहे.