Shoaib Akhtar : ...तर भारत पुढच्या आठवड्यात घर गाठणार; अख्तर बरळला! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shoaib Akhtar Controversial Statement

Shoaib Akhtar : ...तर भारत पुढच्या आठवड्यात घर गाठणार; अख्तर बरळला!

Shoaib Akhtar Controversial Statement : झिम्बाब्वेने पाकिस्तानचा अवघ्या 1 धावेने पराभव केल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट हादरून गेलं आहे. पाकिस्तानचे माजी खेळाडू संघावर, कर्णधारावर आणि संघ व्यवस्थापनावरही टीका करण्याची संधी सोडत नाहीये. मात्र पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने तर कळस गाठला आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवरून बोलताना पाकिस्तान झिम्बाब्वेकडून हरला असताना भारताला मधे घेत आपल्या मनातील गरळ ओकली.

हेही वाचा: AFG vs IRE : पाऊस! 3 सामने झाले, एकही विजय नाही तरी अफगाणी ऑस्ट्रेलियापेक्षा 'वरचढ'

शोएब अख्तर आपल्या यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओत म्हणतो की ज्या प्रकारे पाकिस्तान सुपर 12 मधून या आठवड्यात बाहेर पडले. त्याचप्रमाणे भारतही पुढच्या आठवड्यात सेमी फायनलमधून घरचा रस्ता धरेल. अख्तरने पाकिस्तानच्या संघ व्यवस्थापन आणि कर्णधारावर बोचरी टीका केली. याचबरोबर अख्तर भारताला देखील मधे घेत म्हणाला की, 'पाकिस्तानचा संघ या आठवड्यात घरी परतेल आणि पुढच्या आठवड्यात भारत. भारत काही तीस मार खां नाही. सेमीफायनलमध्ये ते देखील हरतील आणि घरी परततील.'

हेही वाचा: PAK vs ZIM : जय - पराजयानंतर झिम्बाब्वेचे अध्यक्ष अन् पाकचे पीएम यांच्यात रंगले 'ट्विटवर वॉर'

पाकिस्तान गाशा गुंडाळणार; शोएबनेच केली होती भविष्यवाणी

ज्या दिवशी पाकिस्तानच्या निवडसमितीने ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठी संघ जाहीर केला त्याचवेळी शोएब अख्तरने भविष्यवाणी केली होती. तो म्हणाला होता की, 'तुम्हाला जर हाच संघ घेऊन जायचा होता तर ऑस्ट्रेलिया तिथे तुमच्यासाठी काही आरती घेऊन उभा नाहीये. थोडासा चेंडू वळवला आणि सगळं ढासळून जाईल. फलंदाजीची ही मधली फळी घेऊन तुम्ही काय करू शकता? पाकिस्तान पहिल्याच फेरीत बाहेर पडणार नाही याची माला भीती वाटते आहे.