Shoaib Akhtar: 'रावळपिंडी एक्सप्रेस' आता बंद! अख्तरने निर्मात्यांना दिला इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shoaib akhtar left rawalpindi express biopic project

Shoaib Akhtar: 'रावळपिंडी एक्सप्रेस' आता बंद! अख्तरने निर्मात्यांना दिला इशारा

Shoaib Akhtar : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही काळापूर्वी शोएब अख्तरच्या जीवनावर रावळपिंडी एक्सप्रेस नावाचा चित्रपट येत असल्याची घोषणा करण्यात आली होती. आता शोएब अख्तरने या बायोपिकमधून माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे. अख्तर यांनी चित्रपट निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. (shoaib akhtar left rawalpindi express biopic project)

हेही वाचा: Rohit Sharma: एका फॉरमॅटला रामराम! वर्ल्ड कपनंतर रोहित घेणार मोठा निर्णय?

शोएब अख्तरने सोशल मीडियावर चाहत्यांना याची माहिती दिली. शोएब अख्तरने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, अत्यंत दु:खाने, मी तुम्हा सर्वांना कळवू इच्छितो की, अनेक महिन्यांच्या विचारानंतर मी 'रावळपिंडी एक्सप्रेस' चित्रपट आणि त्याच्या निर्मात्यांसोबत माझ्या व्यवस्थापन आणि कायदेशीर टीमद्वारे करार रद्द केला आहे. मी निर्णय घेतला आहे.

यासोबतच शोएब अख्तरने निर्मात्यांना इशाराही दिला आहे, त्याने लिहिले की, जर चित्रपट निर्मात्यांनी चित्रपट पुढे नेला, किंवा माझ्या नावावर किंवा माझ्याशी संबंधित कोणतीही कथा बनवली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

हेही वाचा: IND vs NZ: रोहित शर्मानं पाकिस्तानी क्रिकेटरला मियादादला टाकलं मागे! काय आहे कारण

या चित्रपटात शोएब अख्तरची भूमिका साकारणारा अभिनेता उमेर जसवालनेही चित्रपट सोडला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला उमीरने जाहीर केले होते की चित्रपट निर्मात्यांसोबतच्या वादामुळे त्याने रावळपिंडी एक्सप्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

शोएब अख्तरची गणना जगातील सर्वात वेगवान आणि धोकादायक गोलंदाजांमध्ये केली जाते. तो पाकिस्तानच्या सुपरस्टार क्रिकेटपटूंपैकी एक आहे. तसेच, क्रिकेट सोडल्यानंतर तो कॉमेंट्री आणि यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून चर्चेत राहतो.