IND vs NZ: रोहित शर्मानं पाकिस्तानी क्रिकेटरला मियादादला टाकलं मागे! काय आहे कारण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rohit sharma does javed miandad by fogetting what to do after toss

IND vs NZ: रोहित शर्मानं पाकिस्तानी क्रिकेटरला मियादादला टाकलं मागे! काय आहे कारण

India vs New Zealand : रायपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ते दृश्य पाहायला मिळालं, जे अनेक वर्षांत एकदाच पाहायला मिळालं होते. भारताचा कर्णधार रोहित शर्माने मालिका विजयासाठी महत्वाच्या असलेल्या सामन्यात नाणेफेक जिंकली. मात्र रोहित शर्मा आपण नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायची की गोलंदाजी हेच विसरला होता.

तब्बल 15 सेकंद विचार केल्यानंतर त्याने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर लोक त्याला गजनी म्हणत आहेत. त्याचवेळी रोहितची ही नौटंकी पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियांदादची आठवण करून दिली.

हेही वाचा: IND vs NZ Rohit Sharma : इसरलंय! रोहितने टॉसदरम्यान घातला घोळ, नशीब आठवलं नाही तर...

जावेद मियांदाद ही घटना वाका स्टेडियमवर घडली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्या कसोटी सामन्यादरम्यान नाणेफेक जिंकल्यानंतर मियांदादला काय प्लॅनिंग आहे हेच कळत नव्हते. नाणेफेक जिंकल्यानंतर मियांदाद म्हणाला, 'मला माहित नाही, मी आत जाऊन तुम्हाला कळवतो.' पाकिस्तान क्रिकेट इतिहासात मियांदादचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते, ज्याची कसोटी सरासरी कधीही 50 च्या खाली गेली नाही. एकूण 124 कसोटी सामने आणि 233 एकदिवसीय सामने खेळणाऱ्या मियांदादने 8832 धावा केल्या. मियांदाद आणि सचिन तेंडुलकर हे सहा क्रिकेट विश्वचषक खेळलेले एकमेव खेळाडू आहेत.(rohit sharma does javed miandad by fogetting what to do after toss)

हेही वाचा: IND vs NZ: रोहित शर्मानं पाकिस्तानी क्रिकेटरला मियादादला टाकलं मागे! काय आहे कारण


भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांनी नाणेफेक केली. रोहित शर्माने हेड वर कौल लावला आणि तो लागलाही. जवागल श्रीनाथने रोहितला नाणेफेक जिंकल्याचे सांगितले. मात्र रोहितला आपण फलंदाजी करायची आहे की गोलंदाजी हेच आठवेना. त्यामुळे तो काही काळ थांबला. त्याने डोक्याला हात लावला.