Shoaib Akhtar : पाकिस्तान T20 World Cup च्या पहिल्याच फेरीतून बाहेर होणार; असं का म्हणाला शोएब अख्तर? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shoaib akhtar not happy with pakistan t20 world cup 2022 team

पाकिस्तान T20 World Cup च्या पहिल्याच फेरीतून बाहेर होणार; असं का म्हणाला शोएब अख्तर?

Shoaib Akhtar Pakistan T-20 World Cup 2022 Team : ऑस्ट्रेलियामध्ये पुढील महिन्यात टी-20 वर्ल्ड कप खेळला जाणार आहे. वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तानचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला भारताविरुद्ध खेळायचा आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) टी-20 विश्वचषकासाठी पाकिस्तानी संघाची घोषणा केली असून, त्यानंतर माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने मोठे वक्तव्य केले आहे. शोएब अख्तर म्हणाला की, हा संघ पाहता पाकिस्तानचा संघ टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या फेरीतून बाहेर होणार आहे.

शोएब अख्तरने त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना सांगितले की, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) कोणत्या संघाची निवड केली आहे. अशिया कप मध्ये मिडिल ऑर्डर ही पाकिस्तानी संघाची सर्वात मोठी समस्या राहिली होती, पण असे असतानाही मिडिल ऑर्डर मध्ये कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. हा खराब निर्णय आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर (पीसीबी) निशाणा साधताना शोएब अख्तर म्हणाला की, सामान्य लोकांकडून असाधारण निर्णय घेण्याची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. मला भीती वाटते की पाकिस्तान टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्या फेरीतून बाहेर पडेल.

टी-20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान संघ : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद आणि उस्मान कादिर.

अतिरिक्त खेळाडू: फखर जमान, मोहम्मद हरीस आणि शाहनवाज दहानी.