IND vs PAK : पराभव झोंबला! शोएब अख्तर 'त्या' नो-बॉलवरून अंपायरवर भडकला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shoaib akhtar

IND vs PAK : पराभव झोंबला! शोएब अख्तर 'त्या' नो-बॉलवरून अंपायरवर भडकला

Shoaib Akhtar IND vs PAK : दिवाळीत टीम इंडियाने टी20 वर्ल्ड कप 2022 च्या पहिल्या सामन्यात चाहत्यांना अप्रतिम भेट दिली आहे. मेलबर्नमध्ये रविवारी भारताने पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव केला. या रोमांचक विजयाचा हिरो होता विराट कोहली. त्याला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले. या सामन्यात सर्व काही सुरळीत झालं असे नाही. येथेही अनेक वाद झाले आहेत. त्यांच्यातील सर्वात मोठा वाद म्हणजे शेवटच्या षटकात केलेल्या कंबर नो-बॉलचा होता.

हेही वाचा: Viral Mims: 'ते मॅच हरले नाहीत, आपण जिंकलो' निर्मला सीतारामन यांच्यावर मीम्स!

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने नो-बॉलवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्याने कोहलीचा एक फोटो शेअर केला आणि तो बॉल फेअर डिलीव्हरी असल्याचे सांगितले आहे. पण युजर्सनी लगेच दुसऱ्या फोटो कमेंटमध्ये शेअर केला की हा बॉल कमरेच्या वर जात आहे. त्यामुळे तो एक नोबॉल होता. अख्तरने लिहिले की, अंपायर बंधूंनो, आज रात्री तुमच्यासाठी विचार करायला हवा.

भारतीय संघाला शेवटच्या षटकात विजयासाठी 16 धावांची गरज होती. पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमने फिरकीपटू मोहम्मद नवाजला ओव्हर दिली. अंपायरने ओव्हरचा चौथा चेंडू कंबरेच्या वर गेला म्हणून नो-बॉल घोषित केला. यावरून संपूर्ण वाद निर्माण झाला होता. या चेंडूवर कोहलीने लेग साइडला षटकार मारला. नवाजने शेवटच्या षटकात दोन विकेट्स घेतल्या, पण नो-बॉलने खेळ खराब केला. विराट कोहलीने मॅच विनिंग इनिंग खेळली.