PAK vs ZIM Shoaib Malik : खुद्द शोएब मलिकने 'डेड बॉल'वरून बाबर सेनेला काढलं वेड्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shoaib Malik Criticize Babar Azam PAK vs ZIM

PAK vs ZIM Shoaib Malik : खुद्द शोएब मलिकने 'डेड बॉल'वरून बाबर सेनेला काढलं वेड्यात

Shoaib Malik Criticize Babar Azam PAK vs ZIM : झिम्बाब्वेने पाकिस्तानचा टी 20 वर्ल्डकपमध्ये पराभव करून दोन दिवस अलटून गेले तरी देखील या पराभवाची क्रिकेट वर्तुळातील चर्चा काही थांबलेली नाही. बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघावर या लाजिरवणाऱ्या पराभवानंतर तुफान टीका होत आहे. पाकिस्तानचे माजी खेळी वसिम अक्रम, मिसबाह - उल - हक आणि शोएब मलिक यांनी देखील बाबरच्या कॅप्टन्सीपासून संघनिवडीपर्यंत सर्वांवर प्रश्न उपस्थित केले आहेच. शोएब मलिकने तर त्यांना साधे फ्री हिटवर चेंडू स्टम्पला लागला तर तो डेड बॉल नसतो इतकेही माहिती नव्हते. अशी बोचरी टिका केली.

हेही वाचा: PAK vs ZIM : पाकला धूळ चारण्याऱ्या झिम्बाब्वेच्या मागे भारतीय हात; धोनीच्या वर्ल्डकप विजयातही होते वाटेकरी

पाकिस्तानच्या झिम्बाब्वेने पराभव केल्यानंतर या पराभवाची कारणे शोधण्यासाठी पाकिस्तानच्या वृत्तावाहिन्यांवर कार्यक्रम आयोजित केले जात होते. अशाच एका स्पोर्ट्स चॅनवल आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात पाकिस्तानचा माजी कर्णधार मिसबाह उल हकने पाकिस्तानने ऑस्ट्रेलियातील परिस्थितीचा अभ्यास करून तयारी करायला हवी होती असे वक्तव्य केले. हाच मुद्दा पकडून शोएब मलिकने भारत आणि पाकिस्तान सामन्यातील डेड बॉल वाद उकरून काढला.

शोएब मलिक म्हणाला की, 'त्यांना फ्री हिटवर चेंडू स्टम्पला लागल्यावर डेड बॉल नसतो हे देखील माहिती नव्हतं. त्यामुळे इतर गोष्टींवर बोलण्यात काही अर्थच नाही. त्यांना इतकं साध माहिती नव्हतं. त्यामुळे तुम्ही कोणत्या परिस्थितीत कसं खेळायचं याबद्दल बोलण्यात आता काहीच अर्थ नाही. आपण फक्त शॉर्ट टर्म उपाय शोधण्याचा प्रयत्न करतोय.'

हेही वाचा: Babar Azam : "झिम्बाब्वे लिहिता येईना आणि..." जुन्या ट्विटमुळे पाक कर्णधार होतोय ट्रोल

मलिक पुढे म्हणाला की, 'जर एखादा नळा गळत असेल तर त्यावर कायमचा उपाय म्हणजे तो नळा बदलून टाका. मात्र आपण त्याच गळणाऱ्या नळ्याची डागडुजी करण्याचाच प्रयत्न करतोया. आपल्याला नळा बदलण्याची गरज आहे.' भारत पाकिस्तान सामन्यात शेवटच्या षटकात विराट कोहलीने फ्रि हिटवर तीन धावा पळून काढल्या होत्या. त्यावेळी विराट कोहली मोहम्मद नवाझचा चेंडू मिस झाला होता आणि तो चेंडू स्टम्पला लागला होता. विराटने काढलेल्या धावा या नियमाला धरून होत्या. तरी देखील पाकिस्तानचे खेळाडू पंचांशी हुज्जत घालत होते.