Shoaib Malik Marriage : शोएबच्या तिसऱ्या 'निकाह'वर कुटुंबीय नाराज; मेव्हणा म्हणाला आम्हाला तर...

Shoaib Malik Marriage : शोएब मलिक खूप आधीपासून सनासोबत होता रिलेशनशिपमध्ये
Shoaib Malik Marriage
Shoaib Malik Marriageesakal

Shoaib Malik Marriage : भारताची स्टार टेनिपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांचा घटस्फोट झाल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. त्यानंतर आज शोएब मलिक आणि अभिनेत्री सना जावेद यांच्या निकाहचीच बातमी समोर आली. शोएब मलिकने ट्विटवरून आपल्या तिसऱ्या लग्नाची माहिती सर्वांना दिली.

सानिया मिर्झाने काही दिवसांपूर्वीच एक पोस्ट करून लग्न आणि घटस्फोट या दोन्ही गोष्टी अवघड असल्याचे मत व्यक्त केलं होतं. त्याचवेळी शोएब आणि तिचा घटस्फोट झाल्याची चर्चा सुरू झाली. सानिया मिर्झा ही शोएब मलिकच्या अफेअर्समुळे त्रस्त झाली होती.

Shoaib Malik Marriage
Sania-Shoaib Divorce : शोएबने तलाक दिला नाही तर सानियानेच त्याला सोडलं, काय असते खुला पद्धत?

शोएबच्या विवाहबाह्य संबंधांमुळे सानिया होती त्रस्त

दरम्यान, पाकिस्तानी माध्यमांमध्ये सानिया मिर्झाने 2022 मध्येच शोएब मलिकसोबत तलाक घेण्यासाठी अर्ज केल्याची बातमी आली होती. जिओ न्यूज नुसार 37 वर्षाची सानिया शोएब मलिकच्या विवाहबाह्य संबंधांमुळे वैतागली होती. सुरूवातीला तिने हे प्रकरण सामंजस्याने घेत सोडवण्याचा प्रयत्न केला.

मात्र ती शोएबने धोका दिल्याने नाराज होती. शोएबचे नाव अनेक महिलांशी जोडले गेले त्यानंतर तिने तलाकसाठी अर्ज दाखल केला होता. या वृत्तांमध्ये सानियाने हा अर्ज कोठे दिला होता आणि त्यावर काय निर्णय आला हे सांगितले नाही.

शोएब मलिकचे कुटुंबीयही खूष नाहीत

शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नासाठी त्याच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सामिल झाला नव्हता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सानियासोबत शोएबने संबंध तोडल्यामुळे कुटुंबीय नाराज आहेत. मलिकचा मेव्हणा इम्रान जफरने सांगितले की त्याला या लग्नाबाबत सोशल मीडियाद्वारेच माहिती मिळाली. त्यांनी सांगितलं की शोएबच्या निकाह सोहळ्यात त्यांच्या परिवाराकडून कोणीही सामिल झालं नव्हतं.

Shoaib Malik Marriage
IPL 2024 Venue : आयपीएल 2024 च्या ठिकाणांबाबत उपाध्यक्ष राजीव शुक्लांचे मोठे वक्तव्य

मेव्हणाच म्हणाला शोएबचे खूप आधीपासूनच अफेअर

सूत्रांनी दावा केल्याप्रमाणे शोएब आणि सानिया यांच्यातील वाद मिटवण्यासाठी कुटुंबीय 2022 च्या शेवटी दुबईत गेले होते. शोएबचे कुटुंबीय तलाकच्या बाजूने नव्हते. शोएब मलिकचे कुटुंबीय तलाकमुळे फार दुःखी आहेत. त्यांनी शोएबला नातं सुधारण्यावर लक्ष देण्यास सांगितलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार सना आणि शोएब हे दीर्घ काळापासून रिलेशनशिपमध्ये होते. मात्र शोएबने हे कायम फेटाळलं.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com