Shoaib Malik: शोएब मलिक अडकला पुन्हा लग्नाच्या बंधनात! Insta पोस्ट मुळे सानियासोबत घटस्फोटाच्या अफवांना उधाण

Shoaib Malik marries Pakistan actor Sana Javed amid rumours of seperation with Sania Mirza ntc | अभिनेत्री सना जावेदसोबत शोएब मलिकचे लग्न
Shoaib Malik Marriage with actress Sana Javed Marathi News
Shoaib Malik Marriage with actress Sana Javed Marathi NewsSakal

Shoaib Malik Marriage with actress Sana Javed : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक विवाहबंधनात अडकला आहे. शनिवारी सकाळी त्याने आपल्या लग्नाचा फोटो शेअर केला, शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले आहे.

शोएब मलिकने याआधी भारताची टेनिस सेन्सेशन सानिया मिर्झासोबत लग्न केले होते, मात्र काही दिवसाआधी दोघेही वेगळे झाले अशा बातम्या येत होत्या, आता या दरम्यान शोएब मलिकच्या लग्नाची बातमी समोर आली आहे.

Shoaib Malik Marriage with actress Sana Javed Marathi News
Harbhajan Singh On Ram Mandir : 'मी अयोध्येला जाणार, पक्षाला प्रॉब्लेम असेल तर...' हरभजन सिंहचा केजरीवालांना घरचा आहेर

दोन दिवसांपूर्वीच सानिया मिर्झाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये तिने लिहिले होते की, घटस्फोट घेणे खूप कठीण आहे आणि लग्न करणे देखील खूप कठीण आहे. त्यानंतर कदाचित शोएब मलिक आणि सानिया मिर्झाचा घटस्फोट झाला असल्याचे संकेत मिळत होते. गेल्या एक वर्षापासून अशा अफवा सुरू होत्या की, दोघांमध्ये काही ठीक नाही आणि ते वेगळे होऊ शकतात, ज्याला आता पुष्टी मिळाली आहे.

Shoaib Malik Marriage with actress Sana Javed Marathi News
PCB Zaka Ashraf : पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप! पीसीबीच्या अध्यक्षांनी पदाचा दिला राजीनामा, आता कोण घेणार जागा?

कोण आहे सना जावेद? (Who is Sana Javed)

पाकिस्तानच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक सना जावेदचा घटस्फोट झाला आहे. तिने 2020 मध्ये उमेर जसवालशी लग्न केले. मात्र, दोघे लवकरच वेगळे झाले. त्यानंतर दोघांनीही आपापल्या अकाऊंटवरून एकमेकांचे फोटो डिलीट केले. त्यानंतर दोघांमध्ये घटस्फोटाचे प्रकरण समोर आले. 28 वर्षीय सना पाकिस्तानच्या अनेक टीव्ही शोमध्ये दिसली आहे.

शोएब मलिक आणि सानिया मिर्झाचे लग्न 12 एप्रिल 2010 रोजी झाले होते, तेव्हा भारतात या मुद्द्यावरून बराच वाद झाला होता. या दोघांचे लग्न हैदराबादमध्ये झाले होते आणि त्यांना 2018 साली एक मुलगाही झाला होता. पण कोरोनानंतर दोघांमध्ये तणाव निर्माण झाला होता आणि दोघेही वेगळे राहत होते, काही काळापूर्वी सानिया आणि शोएबने एकत्र पाकिस्तानी शो देखील होस्ट केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com