सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांनी लग्नाच्या १४ वर्षांनंतर जानेवारी २०२४ मध्ये घटस्फोट घेतला होता. त्यानंतर शोएबने अभिनेत्री सना जावेद हिच्याशी लग्न केलं होतं. दरम्यान, या घटस्फोटाच्या एक वर्षानंतर आता दोघांच्या घटस्फोटाचं नेमकं कारण समोर आलं आहे. शोएब मलिकच्या बहिणीनं यासंदर्भात माहिती दिली आहे.