Singapore Badminton Open
Singapore Badminton Opensakal

Singapore Badminton Open : सात्विकराज-चिराग शेट्टीची पहिल्या फेरीत धक्कादायक हार

जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या सात्विकराज आणि चिराग शेट्टी यांना सिंगापूर ओपन स्पर्धेत पहिल्याच फेरीत धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला.

सिंगापूर : जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या सात्विकराज आणि चिराग शेट्टी यांना सिंगापूर ओपन स्पर्धेत पहिल्याच फेरीत धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. जागतिक क्रमवारीत ३४ व्या स्थानावर असलेल्या डॅनिल लुंडगार्ड आणि मादस् वेस्टगार्ड यांनी सात्विक-चिराग यांचा पराभव करून स्पर्धेत खळबळ उडवून दिली. हा सामना त्यांनी २२-२०, २१-१८ असा जिंकला.

या महिन्याच्या सुरुवातीस थायलंड ओपन स्पर्धा जिंकणाऱ्या सात्विक-चिराग यांच्याकडून पॅरिस ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदाची आशा करण्यात येत आहे; पण ही स्पर्धा जवळ आलेली असताना भारताच्या या विश्वविख्यात जोडीचा झालेला पराभव चिंता वाढवणारा आहे. या सिंगापूर ओपन स्पर्धेत आजचा दिवस भारतीयांसाठी निराशाजनकच ठरला.

आकार्षू कश्यप आणि प्रियांशू राजवत यांनाही पुरुष एकेरीत पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. थायलंडच्या पोर्निचा चोईकवाँग याने कश्यपचे आव्हान ४१ मिनिटांच्या लढतीत २१-७, २१-१५ असे संपुष्टात आणले. कर हाँककाँगच्या ली चेऊक यिऊ याने राजवतवर २३-२१, २१-१९ अशी मात केली. महिलांच्या दुहेरीत ऋतुपर्णा पंडा आणि स्वेतपर्णा पंडा यांना कडव्या लढतीनंतर तैपेईच्या चँग चिंग हुई आणि यांग चिंग तून यांच्याकडून १२-२१, २१-१२, १३-२१ अशा पराभवाचा सामना करावा लागला. पी. व्ही. सिंधू, लक्ष्य सेन आणि एसएस प्रणोयही या स्पर्धेत सहभागी झाले असून त्यांच्या लढती उद्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com