Shocking NEERAJ YADAV DEATH : भारताला तीन आशियाई सुवर्णपदकं जिंकून देणाऱ्या भालाफेकपटूची आत्महत्या... राहत्या घरात जे घडलं, ते पाहून सर्व हादरले

Neeraj Yadav death news and latest updates: भारतीय पॅरा अॅथलेटिक्स विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तीन वेळा आशियाई पॅरा गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा भारताचा पॅरा खेळाडू नीरज यादव याचे वयाच्या ४२व्या वर्षी निधन झाल्याचे वृत्त आहे. त्यांच्या मृत्यूच्या बातमीने भारतीय क्रीडा क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
Neeraj Yadav death news

Neeraj Yadav death news

esakal

Updated on: 

Three-time Asian Para Games gold medallist Neeraj Yadav dies at 42: आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत तीनवेळा सुवर्णपदक विजेता ठरलेला नीरज यादव याने मंगळवारी रात्री एका फ्लॅटमध्ये कथितपणे आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने भारतीय पॅरा-ॲथलेटिक्स विश्वाला मोठा धक्का बसला आहे. भालाफेकीत F55 श्रेणीत खेळणाऱ्या ४२ वर्षीय नीरजने विष प्राशन केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन सुरू आहे आणि त्याच्या अहवालानंतर नेमकं काय घडलं हे समोर येईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com