Kabaddi player Brijesh Solanki dies due to infection after dog bite
उत्तरप्रदेशातील खुर्ज येथील फराणा गावातील रहिवासी राज्यस्तरीय कबड्डीपटू ब्रिजेश सोलंकी याचा रेबीजने मृत्यू झाला. ब्रिजेश प्रो कबड्डीत निवडीची तयारी करत होता. त्याचा चुलत भाऊ शिवम यांनी सांगितले की, मार्च महिन्यात गावातील नाल्यात एक पिल्लू पडले होते. ब्रिजेशने ते बाहेर काढले, त्यानंतर पिल्लाने ब्रिजेशच्या उजव्या हाताच्या बोटाला चावा घेतला. त्यानंतर ब्रिजेशने ती साधी दुखापत समजून त्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याला रेबीजविरोधी लस मिळाली नाही.