Shooting World Cup : ऑलिंपिकमध्ये पदक पटकाविणाऱ्या स्वप्नीलवर मदार; नेमबाजी विश्वकरंडक, महिला खेळाडू इलावेनिलचे पुनरागमन
Indian Shooters : नेमबाजी विश्वकरंडकाला म्युनिच येथे सुरुवात होत असून भारताच्या स्वप्नील कुसाळेकडून पदकाची अपेक्षा आहे.महिला गटात इलावेनिल वालारिवनचे पुनरागमन झाले असून, नवोदित खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे.
म्युनिच : नेमबाजी विश्वकरंडकाला येत्या मंगळवारपासून म्युनिच येथे सुरुवात होणार आहे. पॅरिस ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदक पटकावलेल्या स्वप्नील कुसाळे याच्याकडून भारताला पदक पटकावण्याची आशा आहे.