World Cup : राही-मनू-यशस्विनीनं भारताला मिळवून दिलं कांस्य

ISSF वर्ल्ड कप स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात टीम इव्हेंटमध्ये या तिघींनी कांस्य पदकाची कमाई केली.
Shooting World Cup
Shooting World Cup NRAI Twitter

Shooting World Cup : भारताची स्टार नेमबाज राही सरनोबत, मनु भाकर आणि यशस्विनी सिंह देसवाल या तिघींनी देशासाठी आणखी एक पदक मिळवले आहे. ISSF वर्ल्ड कप स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात टीम इव्हेंटमध्ये या तिघींनी कांस्य पदकाची कमाई केली. भारतीय महिला नेमबाजांनी वेरोनिका मेजर, मिरियम जाको आणि सारा राहेल फॅबियनयांना पराभूत करत पदक पक्के केले. कांस्य पदकाच्या लढतीत भारतीय महिलांनी 16-12 अशा फरकाने विजय नोंदवला.

तिघींनी 573 गुणांसह तिसऱ्या स्थानावरुन फायनलसाठी प्रवेश निश्चित केला होता. यापूर्वी ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर, दीपक कुमार आणि दिव्यांश सिंह पवार यांच्या भारतीय पुरुष संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. 10 मीटर एअर रायफल प्रकारात कांस्य पदकाच्या लढतीत पुरुष संघ पराभूत झाला. (Shooting World Cup Yashaswini Singh Deswal Manu Bhaker and Rahi Sarnobat win bronze)

Shooting World Cup
WTC : पराभवानंतर ICC ने किंग कोहलीला दिला आणखी एक धक्का

यापूर्वी ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर, दीपक कुमार आणि दिव्यांश सिंह पवार यांच्या भारतीय पुरुष संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. 10 मीटर एअर रायफल प्रकारात कांस्य पदकाच्या लढतीत पुरुष संघ पराभूत झाला.

Shooting World Cup
लेकीला दूध पाजायचं की ऑलिम्पिक खेळायचं? तिच्यासमोर मोठा प्रश्न

भारतीय पुरुष संघाला तिसऱ्या स्थानासाठीच्या मॅचमध्ये सर्बियाच्या टीमकडून 14-16 अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला होता. सर्बियाच्या टीममध्ये मिलेंको सेबिच, मिलुटिन स्टेफानोविच आणि लजर कोवासेविच यांचा समावेश होता.

अंजुम मोदगील, अपूर्वी चंदेला आणि इलावेनिल वलारिवान यांचा समावेश असणाऱ्या भारतीय महिला संघाला 10 मीटर एअर रायफल प्रकारात निराशा आली. क्वालिफिकेशन राउंडमध्ये एकूण 1867.7 गुणांसह भारतीय महिला संघ 11 व्या स्थानी राहिला. गुरुवारी तिन्ही महिला नेमबाजांना 10 मीटर रायफल स्पर्धेत फायनलमध्ये स्थान मिळवण्यात अपयश आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com