

Shreyas Iyer
esakal
धरमशाला: हातातोंडाशी आलेला विजय हुकल्यानंतर आणि सलग चौथ्या पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर पंजाब संघाचा कर्णधार अधिक प्रमाणात निराश झाला. आव्हानात्मक खेळपट्टीवर किमान ३० धावांचे अधिक पाठबळ होते, तरीही गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात अक्षम्य चुका झाल्या, अशी टीका श्रेयसने केली.
सोमवारी दिल्लीविरुद्ध झालेल्या सामन्यात पंजाबने विजयाची संधी गमावली. दिल्लीसाठी २२ चेंडूंत ४१ धावांची गरज असे समीकरण होते त्या वेळी त्यांचे प्रमुख फलंदाज बाद झाले होते. तरीही पंजाब संघाला विजयाने हुलकावणी दिली.