Shreyas Iyer fitness update
esakal
fitness update on Shreyas Iyer ahead of the India vs New Zealand ODI series : नवीन वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंड संघ भारताच्या दौऱ्यावर येणार असून यावेळी ते टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहेच. यापैकी टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. मात्र, एकदिवसीय मालिकेसाठी संघाची घोषणा अद्याप बाकी आहे. ११ जानेवारीपासून या मालिकेला सुरुवात होणार असून त्यापूर्वी श्रेयस अय्यरच्या ( Shreyas Iyer ) प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.