
श्रेयस अय्यर विराट कोहलीची जागा घेणार?
नवी दिल्ली: विराट कोहलीने नुकतीच कसोटी संघाचे नेतृत्व सोडले. यापूर्वी त्याने टी २० संघाचे आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोरचेही (Royal Challengers Bangalore) नेतृत्व सोडले होते. त्यामुळे आयपीएलच्या (IPL) पुढच्या हंगामात आरसीबीचा (RCB) नवा कॅप्टन कोण असणार याची चर्चा सुरु झाली आहे. त्यात अचानकपणे श्रेयस अय्यरचे (Shreyas Iyer) नाव पुढे येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा नवा कर्णधार श्रेयस अय्यर असू शकतो. (Shreyas Iyer may Appoint RCB Captain)
हेही वाचा: विराट कोहलीने आपला इगो बाजूला ठेवला पाहिजे : कपिल देव
सूत्रानांनी सांगितले की, 'विराट कोहलीने (Virat Kohli) आरसीबीचे नेतृत्व सोडल्यानंतर आरसीबीने श्रेयस अय्यरमध्ये खूप रस दाखवला आहे. त्यांना आरसीबीची धुरा श्रेयस अय्यरकडे सोपवायची आहे. त्यामुळे पुढच्या महिन्यात बंगळुरुमध्ये होणाऱ्या आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये (IPL Mega Auction) आरसीबी श्रेयस अय्यरसाठी आक्रमकपणे बोली लावण्याची शक्याता आहे.'
हेही वाचा: Video: भारत जिंकला चर्चा मात्र 'BABY AB'ची
याचबरोबर सूत्राने सांगितले की, कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि पंजाब किंग्ज (PBKS) देखील श्रेयसवर नजर ठेवून आहेत. अय्यरला देखील आता ज्या फ्रेंचायजीकडून खेळणार आहे त्याचा कर्णधार होण्याची इच्छा आहे. दिल्ली कॅपिटल्सने श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्यानंतर ऋषभ पंतला कर्णाधार केले होते. त्यानंतर श्रेयस अय्यरने दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) रामराम ठोकला. त्यानंतर त्याने लखनौ आणि अहमदाबादचा संघाकडेही तो गेला नाही कारण दोन्ही संघ त्याला कर्णधार करणार नव्हते.
Web Title: Shreyas Iyer May Appoint Rcb Captain After Virat Kohli Stepped Down
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..