श्रेयस म्हणतो टी 20 मध्ये असं करणे म्हणजे गुन्हाच! | Shreyas Iyer said in T20 playing dots ball is a crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shreyas Iyer said in T20 playing dots ball is a crime

श्रेयस म्हणतो टी 20 मध्ये असं करणे म्हणजे गुन्हाच!

भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील टी 20 मालिकेत भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) धडाकेबाज फलंदाजी करत मालिकाविराचा पुरस्कार मिळवला. त्याने दुसऱ्या सामन्यात 74 तर तिसऱ्या सामन्यात 73 धावांची खेळी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. श्रेयस अय्यरने दुखापतीतून सावरत पुनरागमन केले. दुखापतीदरम्यान त्याला आयपीएल संघाचे नेतृत्वही (IPL Captaincy) गमवावे लागले होते.

दुखापतीतून सावरल्यानंतर त्याने भारतीय संघात पुनरागमन केले. तसेच आयपीएलमधील आपली कॅप्टन्सी देखील पुन्हा मिळवली. दरम्यान, टाईम्स ऑफ इंडियाने पुनरागमन करणाऱ्या श्रेयस अय्यरची दीर्घ मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्याला अनेक प्रश्न विचाण्यात आले. या मुलाखतीदरम्यान त्याला टी 20 क्रिकेटमध्ये (T20I Cricket) सध्या काय ट्रेंड सुरू आहेत, कशा प्रकारे फलंदाजी करावी लागते? असे विचारण्यात आले.

त्यावेळी अय्यरने 'टी 20 सामने खेळत असताना तुम्हाला कायम धावा करण्याबाबत विचार करावा लागतो. एक फलंदाज म्हणून मला असे वाटते की टी 20 मध्ये चेंडू वाया घालवणे म्हणजे गुन्हा आहे. याचा फलंदाजावर मोठा परिणाम होते. तुम्ही ज्यावेळी वेस्ट इंडीजच्या (West Indies) संघाबद्दल बोलता त्यावेळी त्यांच्या संघात प्रत्येक जण पहिल्या चेंडूपासून हाणामारी करण्याची क्षमता ठेवतो. त्यामुळे तुम्हाला त्यांच्यासमोर मोठी धावसंख्या उभारणे अत्यंत गरजेचे आहे.'

श्रेयसला तुझा न्यूझीलंडमध्येही (New Zealand) हाच माईंडसेट होता का असे विचारण्यात आले. त्यावेळी त्याने 'हो न्यूझीलंमध्येही मी असाच विचार करत होतो. त्यावेळी एकच फरक होता की तेव्हा माला माझी काय भुमिका होती हे मला माहिती होते. माझी खेळण्याची जागा फिक्स होती. सध्या आम्ही संघात (Team India) लवचिकता आणण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्हाला वेगवेगळी भुमिका पार पाडावी लागते. सध्या संघात ही मानसिकता रूजवण्याचा प्रयत्न सुरू आहे.' असे उत्तर दिले.