रणजी सामन्यात आंध्रविरुद्धच्या लढतीत श्रेयस अय्यरच्या ४८ धावा

आंध्र प्रदेशविरुद्धच्या रणजी सामन्यात आजच्या पहिल्या दिवसअखेर मुंबईने ६ बाद २८१ धावांपर्यंत मजल मारली.
रणजी सामन्यात आंध्रविरुद्धच्या लढतीत श्रेयस अय्यरच्या ४८ धावा

मुंबई : अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर असे नावाजलेले फलंदाज असतानाही मुंबईचा डाव सावरण्याची वेळ शम्स मुलानी आणि तनुष कोटियन या सातव्या-आठव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांवर आली. आंध्र प्रदेशविरुद्धच्या रणजी सामन्यात आजच्या पहिल्या दिवसअखेर मुंबईने ६ बाद २८१ धावांपर्यंत मजल मारली.

बीकेसी येथील शरद पवार अकादमीतील मैदानात सुरू झालेल्या या सामन्यात अर्धशतकी सलामीनंतर मुंबईला वर्चस्व मिळवता आले नाही. आंध्रने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजी दिली. जय बिस्ता आणि भुपेन लालवानी यांनी ६९ धावांच सलामी दिली.

२२ व्या षटकांत जय बिस्ता बाद झाला आणि पहिल्या चेंडूवर कर्णधार अजिंक्य रहाणे शुन्यावर पायचीत झाला. ६९ या धावसंख्येवर मुंबईने दुसरा फलंदाज गमावला. रहाणेचा हा यंदाच्या मोसमातील पहिलाच रणजी सामना आहे. बिहारविरुद्धच्या सामन्यात मान दुखावल्यामुळे तो खेळला नव्हता. दुसरा सलामीवीर भुपेन लालवानी आणि सुवेद पारकर यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी करून डाव सावरला.

भुपेन १० चौकारांसह ६१ धावांची खेळी करून बाद झाला. सुवेद आणि श्रेयस अय्यर यांनी चौथ्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केली; पण हे दोघेही १२ धावांच्या फरकाने बाद झाले. दोघांनीही अर्धशतकाची संधी गमावली. श्रेयसने ४८ चेंडूत सात चौकारांसह ४८ धावा फटकावल्या. मुंबईचा ६ वा फलंदाज प्रसाद पवार बाद झाला, तेव्हा धावफलकावर २२४ धावाच जमा होत्या. परिस्थिती अडचणीची होती, अशा वेळी शम्स मुलानी आणि तनुष कोटियन संघाच्या मदतीला धावून आले.

संक्षिप्त धावफलक ः मुंबई, पहिला डाव ः ६ बाद २८१ (जय बिस्ता ३९, भुपेन लालवानी ६१, अजिंक्य रहाणे ०, सुवेद पारकर ४१, श्रेयस अय्यर ४८ -४८ चेंडू ७ चौकार, शम्स मुलानी खेळत आहे ३०, तनुष कोटियन खेळत आहे ३१, के. नितीश कुमार रेड्डी १६.४-२-४४-२, शोएब मोहम्मद खान १०-०-४२-२)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com