Ajit Pawar : प्रो-कबड्डीत अजित पवार करणार यूपीचा बचाव; बचावपटू म्हणून झाली निवड

खेळाशी जुळलेली नाळ कायम राहिल्याने, अजित पवारसाठी व्यावसायिक पातळीवर कबड्डीचे मैदान झाले खुले.
Ajit Pawar
Ajit PawarSakal

श्रीरामपूर - येथील निपाणी वडगावचा अजित पवार याला शालेय जीवनापासून खेळाची आवड. तेव्हापासून खेळाशी जुळलेली नाळ कायम राहिल्याने, त्याच्यासाठी व्यावसायिक पातळीवर कबड्डीचे मैदान खुले झाले. शाळा- महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान कबड्डीतील व्यावसायिक बाजू समजल्यानंतर टाकळीभान येथे घेतलेले प्रशिक्षण व कोविड काळात गावातच मैदान गाजवीत प्रो-कबड्डी लीगच्या यूपी योद्धा संघात बचावपटू म्हणून झालेली निवड त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली.

जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेत असताना शाळेतील खडकाळ माळरानावर शिक्षक आनंद वाघ यांनी विद्यार्थ्यांना सोबत घेत खेळाचे मैदान बनविले. येथूनच अजितच्या जीवनात खेळाला सुरवात झाली. चौथीला असताना तालुकास्तरावर कबड्डी खेळला. दहावीत असताना गणेश राऊत यांनी टाकळीभान येथे कबड्डी प्रशिक्षक रवी गाढे यांच्या आझाद क्रीडा मंडळ क्लबमध्ये सरावासाठी जाण्याचा सल्ला दिला. २०१४-१५ पासून या क्लबकडून खेळायला सुरवात केली.

२०१९ मध्ये प्रथमच राज्यस्तरीय निवडचाचणी स्पर्धेसाठी पात्र ठरला. २०२२-२३ मध्ये ७० व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत दुसरा क्रमांक मिळाला. २०२२-२३ मध्ये महाराष्ट्र ऑलिंपिक कबड्डी स्पर्धेत संधी मिळाली. २०२२-२३ मध्ये जबलपूरला विद्यापीठ स्पर्धेमध्ये भारतीय विद्यापीठाचे नेतृत्व केले.

या कामगिरीवर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने त्याला करारबद्ध केले. विविध स्पर्धांमध्ये त्याला उत्कृष्ट बचावपटू म्हणून गौरविण्यात आलेले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली २०२२-२३ मध्ये आयोजित क्रांतिज्योत महिला प्रतिष्ठान युवा सिरीज कबड्डी स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला.

Ajit Pawar
Shirdi News : साईसंस्थानमधील ५९८ कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळाला न्याय; ४० टक्के मिळाली वेतनवाढ

६४ टॅकल पॉइंट घेऊन स्पर्धेतील उत्कृष्ट बचावपटू म्हणून त्याचा गौरव करण्यात आला. कबड्डी खेळाडू श्रीकांत जाधव यांच्यामुळे व्यावसायिक कबड्डी समजली. आता पीकेएलचा दहावा सीझन सुरू होणार असून, यात यूपी योद्धा संघाच्या बचाव फळीची भिस्त ही अजितवर असणार आहे.

किटसाठी मित्रांनी दिले पैसे

गावामध्ये यात्रेत कुस्ती बघत बघत कुस्ती खेळणे सुरू केले. त्यानंतर सातवीला असताना कबड्डीचा सराव करायला सुरवात केली. टी-शर्ट घेण्यासाठी पैसे नव्हते. मित्रांकडून घेऊन कबड्डीसाठी किट घेतले. त्याचे कबड्डी खेळणे आई-वडिलांना आवडत नसे. त्यावरून लहानपणी मार खावा लागला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com