कोल्हापूर जिल्ह्यातील अरळगुंडी (ता. गडहिंग्लज) येथील शुभांगी यांचा विवाह विट्यातील कैलास सुतार यांच्याशी झाला. मानसशास्त्रज्ञ कैलास यांनी पूर्वी शरीरसौष्ठव स्पर्धा गाजवल्या आहेत.
सांगली : शरीरसौष्ठव (Bodybuilding) हे पुरुषी क्रीडा क्षेत्र. डौलदार; तसेच प्रमाणबद्ध शरीराचे सौष्ठव म्हणजे बळकट शरीराचे जाहीर प्रदर्शनच. आखीव-रेखीव स्नायू, सुडौलता, पिळदारपणा दाखवताना खेळाडूंचा कस लागतो. पुरेशी विश्रांती, पोषक आहार, वजन या गोष्टींचे तंतोतंत पालन करण्यासाठी शरीरसौष्ठवपटू वर्षानुवर्षे कसरत करत असतात. स्पर्धा म्हणून शरीराचे प्रदर्शन करण्यात पुरुषाला जशी सवय असते, तसे महिलांनी करणे खरे तर आव्हान.