
Shubman Gill Six: अरे व्वा! गिलने 104 मीटर लांब षटकार मारला, चेंडू थेट बाहेर
Shubman Gill Six IND vs WI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना पोर्ट ऑफ स्पेन त्रिनिदाद येथे खेळला गेला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडियासाठी शुभमन गिल आणि कर्णधार शिखर धवन यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत संघाला दमदार सुरुवात करून दिली. गिलने त्यादरम्यान कारकिर्दीतला सर्वात लांब लचक 104 मीटर षटकार मारला.
हेही वाचा: IND vs WI: ऐतिहासिक कामगिरी! टीम इंडियाचा विंडीजवर शानदार 119 धावांनी विजय
वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शुभमन गिलने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वात मोठी खेळी खेळली. पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात गिलने नाबाद 98 धावा केल्या. गिलचा षटकार इतका लांब होता की चेंडूच हरवला आणि पुन्हा सापडला नाही. यानंतर अंपायरला दुसरा चेंडू घेऊन यायला लागला. भारतीय सलामीवीर गिलने डावाच्या १५व्या षटकात हेडन वॉल्शच्या चेंडूवर लाँग षटकार मारला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना शिखर धवन आणि शुभमन गिल या जोडीने पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. धवनला बाद करून वॉल्शने भारताला पहिला धक्का दिला. पाऊस थांबल्यानंतर भारताने श्रेयस अय्यर (44) आणि सूर्यकुमार यादव (8) यांच्या रूपात आणखी दोन विकेट गमावल्या. दुसऱ्यांदा पाऊस थांबला तेव्हा गिल 98 धावांवर परतला, भारतीय डाव पावसात संपुष्टात आला आणि विंडीजला 257 धावांचे लक्ष्य मिळाले.
लक्ष्याचा पाठलाग करताना मोहम्मद सिराजने दुसऱ्याच षटकात दोन धक्के देत यजमानांना बॅकफूटवर ढकलले. ब्रेंडन किंग आणि निकलोस पूरनने प्रत्येकी 42 धावा केल्या तर शे-होपने 22 धावा केल्या. या तिघांशिवाय विंडीजच्या एकाही फलंदाजाला 10 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही आणि संपूर्ण संघ 137 धावांत गारद झाला.
Web Title: Shubman Gill 104 Meter Long Six Ball Out Of Stadium Ind Vs Wi 3rd Odi India Thrash Windies West Indies Sports Cricket
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..