Shubman Gill : एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत शुभमन गिल चौथ्या स्थानावर

मंगळवारी झालेल्या अफगाणिस्तान आणि पाक यांच्यातील सामन्यानंतर आयसीसीने आज एकदिवसीय क्रमवारी जाहीर
shubman gill climbs to no4 spot in icc odi 2023 rankings for the batters cricket
shubman gill climbs to no4 spot in icc odi 2023 rankings for the batters cricketsakal

दुबई : सलामीवीर शुभमन गिलने आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकेट फलंदाजीच्या क्रमवारीत एका स्थानाने पुढे पाऊल टाकत चौथा क्रमांक मिळवला आहे; तर ट्वेन्टी-२० प्रकारात जसप्रीस बुमरा आणि रवी बिश्नोई यांनीही चांगली प्रगती केली आहे.

मंगळवारी झालेल्या अफगाणिस्तान आणि पाक यांच्यातील सामन्यानंतर आयसीसीने आज एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली. त्यानुसार गिलच्या खात्यात ७४३ रेटिंग गुण जमा झाले आणि तो चौथ्या क्रमांकावर पोहचला.

प्रदीर्घ कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या जसप्रीत बुमराने आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात प्रभावशाली कामगिरी केली, त्यामुळे तो सात क्रमांकाने प्रगती करत ८४ व्या स्थानावर पोहचला आहे. तसेच लेगस्पिनर रवी बिश्नोईने १७ क्रमांकाची झेप घेत ६५ व्या स्थानावर मजल मारली आहे.

आयर्यंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत खेळत नसला तरी फलंदाजीच्या क्रमवारीत सूर्यकुमार यादवचा पहिला क्रमांक कायम राहिला आहे. एकदिवसीय क्रमवारीत पाकचा कर्णधार बाबर आझम आणि इमाम उल हक अनुक्रमे पहिल्या आणि तिसऱ्या स्थानावर कायम आहेत. भारताचे विराट कोहली नवव्या आणि कर्णधार रोहित शर्मा ११ व्या क्रमांकावर आहेत.

कसोटीतील गोलंदाजीच्या क्रमवारीत आणि अष्टपैलू क्रमवारीत अनुक्रमे भारताचे आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा कायम आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com