Shubman Gill : शुभमन गिल सूर्याच्या वळणावर; कसोटी संघातून होणार बाहेर?

Shubman Gill
Shubman Gillesakal

Shubman Gill Indian Test Cricket Team : भारतीय कसोटी संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा एक डाव आणि 32 धावांनी पराभव झाला. पहिल्या कसोटीत भारताकडून विराट कोहली आणि केएल राहुल यांची खेळी सोडली तर इतर फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही.

भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल याच्याकडून सर्वांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र गेल्या काही कसोटी सामन्यांत त्याला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. भारतीय टी 20 संघाचा उपकर्णधार सूर्यकुमार यादव हा टी 20 मध्ये दमदार कामगिरी करतोय. मात्र वनडे सामन्यात त्यांची कामगिरी अत्यंत सुमार दर्जाची झाली आहे. त्यामुळे तो वनडे संघात आत बाहेर असतो.

Shubman Gill
Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणे संघाच्या कर्णधारपदी! पृथ्वी शॉ बाहेर... शिवम दुबेला मिळाली संधी

अशीच अवस्था शुभमन गिलची कसोटी संघात होण्याची शक्यता आहे. शुभमन गिल वनडे क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करतोय. मात्र कसोटी संघात त्याला अजूनही जम बसवता आलेला नाही. शुभमन गिलने जेव्हापासून सलामीऐवजी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास सुरूवात केली आहे. तेव्हापासून त्याला फार मोठी खेळी केलेली नाही.

शुभमन गिलने 35 कसोटी डावात जवळपास माजी अष्टपैलू इरफान पाठण इतक्याच धावा केल्या आहेत. तर आर अश्विनपेक्षाही त्याच्या धावा कमी आहेत. शुभमन गिलची तुलना ही चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे सारख्या कसलेल्या फलंदाजांशी केली जात आहे. ही आकडेवारी त्याच्या कसोटीतील भविष्यासाठी चांगली नाही. जर त्याला कसोटी संघातील आपले स्थान टिकवायचं असेल तर त्याला कामगिरी करून दाखवावी लागले.

Shubman Gill
AUS vs PAK 3rd Test : आफ्रिदीला संघातून दाखवला बाहेरचा रस्ता! पाकिस्तानच्या नव्या कर्णधारचा मोठा निर्णय

रांगेत अजून अनेक खेळाडू

शुभमन गिलने जर लवकरात लवकर कसोटी संघातील आपले स्थान पक्के केले नाही तर त्याची जागा घेण्यासाठी अनेक युवा खेळाडू रांगेत उभे आहेत. फक्त अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा वाट पाहत नाहीयेत तर सरफराज खान, हनुमा विहारी, प्रियांक पांचाल असे खेळाडू देखील रांगेत आहेत. त्यांनी देशांतर्गत स्पर्धेत खोऱ्याने धावा केल्या आहेत. हे सर्व खेळाडू कसोटी पदार्पणाची संधी मिळण्याची वाट पाहत आहेत.

गिलपेक्षा अश्विनच्या धावा जास्त

आकडेवारीनुसार शुभमन गिलने 35 डावात 994 धावा केल्या आहेत. तर इरफान पठाणने 986 धावा केल्या आहेत. दुसरीकडे रविचंद्रन अश्विनने गेल्या 35 कसोटी डावात 1006 धावा केल्या आहेत.

गेल्या 35 कसोटी डावातील गिलच्या धावा

रविचंद्रन अश्विन - 1035 धावा

शुभमन गिल - 994 धावा

इरफान पठाण - 986 धावा

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com