
बर्मिंगहॅम : कसोटी सामन्यांसाठी वापरण्यात येणारा ड्युक्स चेंडू हा ४० ते ५० षटकांनंतर केवळ जुना होत नाही, तर किंचित मऊ होतो. त्यामुळे गोलंदाजांसाठी संधी निर्माण करणे अधिक कठीण होते. बॅटच्या कडेला चेंडू लागल्यास तो प्रत्येक वेळी क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचेलच, असे नाही. त्यामुळे उपलब्ध झेल घेतल्याशिवाय पर्याय उरत नाही, असे स्पष्ट मत भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल याने व्यक्त केले.